शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास माफी नाही; लातूर जिल्ह्यात ५२ नागरिकांविराेधात गुन्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 16:41 IST

Corona Virus: सार्वजनिक ठिकाणी हाेणारी गर्दी टाळण्यासाठी काेराेना नियमांचे पालन करण्याची गरज आहे. याबाबत प्रशासनाने काही नियम आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

लातूर : शासन आणि प्रशासनाने जारी केलेल्या काेराेना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केल्याप्रकरणी लातूर शहरासह जिल्ह्यातील २३ पाेलीस ठाण्यामध्ये ५२ नागरिकांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश डावलत काेराेना नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर येथील जिल्हाधिकाऱ्यांनी काेराेनाच्या वाढतील रुग्णसंख्या राेखण्यासाठी निर्बंध जाहीर केले आहेत. या निर्बंधाचे पालन करण्याचे आवाहन जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी हाेणारी गर्दी टाळण्यासाठी काेराेना नियमांचे पालन करण्याची गरज आहे. याबाबत प्रशासनाने काही नियम आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार मास्क अनिवार्य करण्यात आले असून, मॉल-हॉटेल आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी दोन डोस घेतलेल्यांना, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, गर्दी न होऊ देता मास्कचा वापर करत व्यवसाय, दैनंदिन कामकाज करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, लातूर शहरातील काही हॉटेल्स, खासगी शिकवणी, पान-टपरी, ऑटोमोबाईल्स, कॉफी शॉप चालक यांच्यासह इतर आस्थापना चालकाकडून नियमांचे पालन होत नसल्याचे समाेर आले आहे. त्यांच्याकडून काेराेना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.

लातूर जिल्ह्यात प्रशासनाने जाहीर केलेल्या काेराेना नियमांचे उल्लंघन करणे, विनामास्क फिरणारे व्यक्ती, गर्दी करुन व्यवसाय करणारे दुकानदार, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करता लोकांच्या जीविताला, व्यक्तिगत सुरक्षा धाेक्यात आणणाऱ्या ५२ व्यक्तीविरोधात विरोधात कलम १८८, २६९, २७० भादंवि, कलम ५१ (ब), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, कलम ११, महाराष्ट्र काेविड- १९ उपाययोजना अधिनियम २०२०, कलम २, ३, ४ साथरोग अधिनियम तसेच कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा आणि इतर कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

मास्क, नियमांचे पालन करा...लातूर शहरासह जिल्ह्यात आता दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्कचा वापर करावा, विनाकारण भटकंती टाळावी, सोशल डिस्टन्स ठेवावा, सॅनिटायझरचा वापर करावा. शिवाय, काेराेना नियमांचे पालन करावेत असे आवाहन पाेलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविराेधात आता थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. - निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याlaturलातूर