लातूर : कोरोनाचा संसर्ग सुरू असून, शनिवारी २९९ रूग्णांची भर पडली असून, उपचारानंतर ४२८ जण कोरोनामुक्त झाले. आता बाधितांचा आलेख ८७ हजार २१८ वर पोहोचला असून, यातील ८० हजार ८९९ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ४ हजार ३७५ रूग्ण सध्या उपचाराधीन आहेत.
आतापर्यंत १ हजार ९४४ जणांचा मृत्यू झाला असून, यातील २६ जणांचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत १ हजार ३१ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात १४८बाधित आढळले असून, २ हजार १५३ जणांची रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली. त्यात १५१ पॉझिटिव्ह आढले आहेत. दोन्ही चाचण्या मिळून २९९ रूग्ण आढळले आहेत. तरउपचारादरम्यान एकूण २६ जणांचा मृत्यू झाला. त्यातील १३ जणांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक होते. पाच जणांना कोरोनासह अन्य व्याधी होत्या. तर आठ जणांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी होते, असे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातून सांगण्यात आले. सध्या उपचार घेत असलेल्या ४ हजार ३७५ रूग्णांपैकी५३४ रूग्ण आयसीयूमध्ये आहेत. २६ रूग्ण गंभीर मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर आहेत. २६१ रूग्ण गंभीर बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर आहेत. तर ७३२ रूग्ण मध्यम लक्षणाची परंतु, ऑक्सीजनवर आहेत. ३०२ रूग्णांमध्ये मध्यम लक्षणं असून ते विनाऑक्सीजनवर आहेत. ३ हजार ५४ रूग्णांना सौम्य लक्षणे आहेत. २ हजार ६५८ रूग्ण गृहविलगीकरणा तर १ हजार ७१७ रूग्ण विविध दवाखाने व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख यांनी सांगितले.
४२८ रूग्णांना रूग्णालयातून सुटीप्रकृती ठणठणीत झाल्याने ४२८ रूग्णांना शनिवारी सुटी देण्यात आली. त्यात होम आयसोलेशनमधील २९४, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील १७, सामान्य रूग्णालय उदगीर येथील ७, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक येथील २०, ग्रामीण रूग्णालय अहमदपूर येथील ५, चाकूर येथील २, देवणी येथील १, कासारशिरसी येथील ३, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील २५, पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतनमधील २२ अशा एकूण ४२८ जणांनी कोरोनावर मात केली.
मृत्यूचे प्रमाण कायम...मृत्यूचा दर गेल्या अनेक दिवसांपासून १.८ टक्के आहे. दररोज २५ च्या पुढून रूग्ण मृत्यू पावत आहेत. याबाबत आरोग्य विभाग चिंतेत असून, मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७५ टक्के असून, रूग्ण दुपटीचा कालावधी २४ दिवसांवर गेला आहे, असेही जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले.