दीड वर्षांत झाली वाढ...
मृत्यूपत्र करण्याचे प्रमाण पूर्वी चार ते पाच टक्के होते. मात्र, कोरोनामुळे यात कमालीची वाढ झाली आहे. साधारणपणे मागील दीड ते दोन वर्षांत सदरील प्रमाण १० ते १२ टक्क्यांवर पोहोचले आहे. चालू वर्षात तर हे प्रमाण आणखीन वाढणार असल्याचे शहरातील विधिज्ञांनी सांगितले.
वकील प्रतिक्रिया...
मृत्यूपत्र तयार करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यासोबतच शेतजमीन वाटणी करणे, मृत्यूपत्र तयार करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. मृत्यूनंतर कुटुंबात वाद नको म्हणून अनेकजण हा निर्णय घेत आहेत.
- ॲड. सुहास पाटील, लातूर
पूर्वी संपत्ती अधिक असेल तर मृत्यूपत्र केले जात असे. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. हीच बाब लक्षात घेऊन अनेकजण मृत्यूपत्र तयार करून घेत आहेत.
ॲड. ज्ञानेश्वर निंगुळे, लातूर
५० व्या वर्षी मृत्यूपत्र...
शहरातील एका ५० वर्षीय व्यक्तीला पत्नी, तीन मुली आहेत. त्यांनी आपले मृत्यूपत्र तयार केले आहे. त्यात मुलीचा मुलगा दत्तक घेतला असून, सर्व संपत्ती पत्नीसह मुलींच्या नावे केली आहे.
६० व्या वर्षी मृत्यूपत्र...
एक ६० वर्षीय व्यक्तीला तीन मुले आहेत. त्यांनी सर्व मुलांना समान शेतीची वाटणी केली आहे. तसेच शहरातील प्लॉट आणि इतर मालमत्ता समसमान पद्धतीने वाटप केल्या आहेत.
७५ व्या वर्षी मृत्यूपत्र...
शहरातील एका ७५ वर्षीय व्यक्तीला दोन मुली आणि दोन मुले आहेत. मुले चांगल्या ठिकाणी नोकरीला असल्याने त्यांनी मुलांसोबत मुलींनाही संपत्तीमध्ये वाटा दिला आहे. त्यामुळे कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यूपत्रात समावेश आहे.