कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक,घराघरात वाढली चारचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:21 AM2021-07-27T04:21:20+5:302021-07-27T04:21:20+5:30

म्हणून घेतली कार... लॉकडाऊन काळात नातेवाईकांच्या कार्यक्रमास जायचे होते. अनेक वाहनधारकांना विचारणा केली पण कोरोनाच्या भीतीने कुणीच यायला धजेना. ...

Corona caused a break in passenger traffic, increased four-wheelers in homes | कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक,घराघरात वाढली चारचाकी

कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक,घराघरात वाढली चारचाकी

Next

म्हणून घेतली कार...

लॉकडाऊन काळात नातेवाईकांच्या कार्यक्रमास जायचे होते. अनेक वाहनधारकांना विचारणा केली पण कोरोनाच्या भीतीने कुणीच यायला धजेना. मग डोक्यात विचार आला अन् महिनाभरातच कार घेतली. - अरविंद कदम, कार मालक

........................

प्रवासी वाहनांतून जात असताना अनेकदा सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बघितले. कोरोनाचा धोका वाढत असल्याने खर्च वाढला तरी चालेल म्हणून नवीन कारची खरेदी केली. स्वत:चे वाहन असल्याने आता सुरक्षितता वाढली असून बाहेर जाण्यासाठी चिंता नाही. - सुबोध पवार, कार मालक

...............................

रोजगारही निघेना...

मी गेल्या दहा वर्षांपासून लातूरमध्ये ऑटाेरिक्षा चालवितो. दररोज किमान ८०० रूपये खर्च वजा जाता शिल्लक रहायचे. मात्र लॉकडाऊनपासून व्यवसाय खूपच कमी झाला आहे. रस्त्यावर माणूसच मिळत नाही. जाग्यावरून भरून निघाले तरच चार पैसे होतात. नाहीतर खर्च भागविणेही कठीण झाले आहे. - शब्बीर शेख, ऑटोचालक

............................

उपासमारीची वेळ...

सकाळी ७ वाजता घराबाहेर पडलो. दुपारपर्यंत रोजगार निघायचा. दुपारी आराम करून ५ वाजता बाहेर निघालो की पुन्हा किमान ५०० रूपये तरी यायचे. आता संपूर्ण चित्रच उलटे झाले आहे. प्रवासीच मिळत नाहीत. दिवसभर ऑटो चालविला तरी तेल टाकून रोजगारही निघत नाही. - संतोष शेंडगे, ऑटोचालक

मोटारसायकल चारचाकी

२०१९ २२३२७ २१३०

२०२० २६४१२ ३४२४

२०२१ २८९१७ ३०४२

Web Title: Corona caused a break in passenger traffic, increased four-wheelers in homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.