शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक शाखेचा विधायक उपक्रम; १००० ॲटोचालकांना गणवेश भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 23:26 IST

कार्यक्रमाला डीवायएसपी जितेंद्र जगदाळे, पाेलिस निरीक्षक गणेश कदम, पाेलिस उपनिरीक्षक आवेझ काझी, पाेलिस उपनिरीक्षक आयुब शेख यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

लातूर : रिक्षाचालकांना गणवेश सक्ती करण्याचा विचार असून, त्यासाठी लातूर शहर वाहतूक शाखा, विविध सामाजिक संस्था, व्यापाऱ्यांच्या पुढाकारातून तब्बल एक हजार ऑटाेचालकांना माेफत गणवेश वाटपाचा विधायक उपक्रम लातूर पाेलिसांनी हाती घेतला आहे. याचा प्रारंभ शनिवारी गांधी चाैक ठाण्यात एका कार्यक्रमात करण्यात आला. पहिल्या टप्प्यामध्ये पाेलिसांनी २०० ऑटाेचालकांना गणवेश भेट दिला. कार्यक्रमाला डीवायएसपी जितेंद्र जगदाळे, पाेलिस निरीक्षक गणेश कदम, पाेलिस उपनिरीक्षक आवेझ काझी, पाेलिस उपनिरीक्षक आयुब शेख यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

यावेळी अजित भुतडा, मनीष बाेरा, गाैरव ब्रिजवासी, अग्रवाल, जितू मुंदडा, महेश बिलगुडी यांचा सत्कार करण्यात आला. लातुरातील ऑटाे रिक्षाचालकांना गणवेश सक्ती करावी का? असा प्रश्न पहिल्यांदा पाेलिसांसमाेर आला. मात्र, आता तातडीने प्रत्येक ऑटाेचालकांना गणवेश घेणे शक्य हाेणार नाही. यासाठी पाेलिसांनीच विविध सामाजिक संस्था, व्यापाऱ्यांशी संवाद साधत आवाहन केले. या आवाहनाला माेठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या सहभागातून तब्बल १ हजारांवर मोफत गणवेश वाटपाचा निर्णय घेतला. पहिला टप्पा म्हणून गांधी चाैक येथे शनिवारी कार्यक्रमात २०० रिक्षाचालकांना गणवेशाची भेट दिली.

या चालकांना माेफत गणवेश...लातुरातील ऑटाे रिक्षाचालकांना आता गणवेश सक्ती केली जात आहे. त्यासाठी लातूर पाेलिसांकडून ऑटाेचालकांना गणवेश वाटप केले जात आहेत. यासाठी ज्या रिक्षाचालकांकडे लायसन्स आणि परमिट आहे, अशा एक हजार परवानाधारक रिक्षाचालकांना गणवेशाचे वाटप केले जाणार आहे.

संस्था, पाेलिसांनी घेतला पुढाकार...लातूर शहर वाहतूक पोलिस शाखेने खटले दाखल करून वाहनधारकांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता सामाजिक बांधिलकीचेही उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून रिक्षाचालकांना गणवेश वाटप करण्याचा विधायक उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी सामाजिक संस्थांचे पाठबळ मिळत आहे. त्यांच्या सहकार्यातून तब्बल एक हजार रिक्षाचालकांना मोफत गणवेशाची भेट दिली जात आहे. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसlaturलातूर