शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे नेटवर्क, भाजपाची ताकद! लातुरात देशमुख विरूद्ध चाकूरकर सामना रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 19:45 IST

लातूर शहर विधानसभेचे चित्र स्पष्ट; पुनर्रचनेनंतरची चौथी निवडणूक चुरशीची

लातूर : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाने माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील - चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना पाटील - चाकूरकर यांना उमेदवारी देत लातूर शहर विधानसभा मतदारसंघात चुरस निर्माण केली आहे. 

पुनर्रचनेनंतरची ही चौथी निवडणूक आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील - चाकूरकर आणि दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे केंद्रात व राज्यात दीर्घकाळ सत्तेत होते. माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील - निलंगेकर, चाकूरकर व देशमुख ही जिल्ह्यातील काँग्रेसची दिग्गज तीन घराणी आहेत. केंद्रात चाकूरकर आणि राज्यात डॉ. निलंगेकर व देशमुख असे समीकरण राहिले. परंतु, २०१४नंतर राजकारणाची दिशा बदलत गेली. काही महिन्यांपूर्वी डॉ. अर्चना चाकूरकर भाजपामध्ये दाखल झाल्या. तेव्हापासूनच शहर विधानसभा मतदारसंघात त्या उमेदवार असणार याची चर्चा जोर धरू लागली होती. दरम्यान, सोमवारी भाजपाकडून डॉ. अर्चना यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले. तूर्त तरी सामना दुरंगी दिसत असून, वंचित बहुजन आघाडीकडून विनोद खटके हेही मैदानात आहेत. ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर राजकीय समीकरणे अधिक ठळकपणे समोर येतील.

काँग्रेसचे नेटवर्क, भाजपाची ताकदलातूर शहर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांचे जाळे, नेटवर्क तगडे आहे. मागील तीनही निवडणुकांमध्ये माजी मंत्री आ. देशमुख मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. त्याचवेळी २०१४ आणि २०१९च्या निवडणुकीत भाजपाने ७० हजारांवर मते घेत मतांचा ३३ ते ३४ टक्के वाटा मिळविला होता. त्यामुळे भाजपाची म्हणून मते पक्की आहेत, तर काँग्रेसला तिन्ही निवडणुकांमध्ये अनुक्रमे ६४.९१ टक्के, ५८.८२ व ५२.४८ टक्के मते मिळाली होती. पुनर्रचनेनंतरच्या चौथ्या निवडणुकीत मात्र भाजपाने डॉ. अर्चना यांना उमेदवारी देऊन निवडणूक चर्चेत आणली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४latur-city-acलातूर शहरmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकAmit Deshmukhअमित देशमुख