लातूर : जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी सायकल रॅली काढत पेट्रोल-डिझेल, गॅसच्या दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला तसेच पेट्रोल-डिझेल आणि गॅसची दरवाढ तातडीने मागे घेण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
मागील काही दिवसांपासून देशभरात पेट्रोल-डिझेलसह गॅसची दरवाढ होतच आहे. दिवसेंदिवस वाढत्या इंधन दरवाढीने जनता त्रस्त आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईने उच्चांक गाठला आहे. देशातील जनतेला जगणे मुश्कील झाले आहे. अशा स्थितीतही केंद्र सरकार वाढत्या पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीवर गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा काँग्रेसतर्फे लातूर शहरातील साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीविरोधात शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी आराधी, गोंधळ घालत अनोखे आंदोलन करण्यात आले. महात्मा गांधी चौक येथून निघालेल्या रॅलीचा समारोप भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर झाला.
यावेळी लातूर जिल्हा काॅंग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, मनपा गटनेते ॲड. दीपक सूळ, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, सुभाष घोडके, प्रवीण पाटील, ॲड. फारूक शेख, विजयकुमार साबदे, कैलास कांबळे, मोहन सुरवसे, महेश काळे, सचिन दाताळ, ॲड. देवीदास बारूळे पाटील, प्रवीण सूर्यवंशी, प्रदीपसिंह गगणे, युनूस मोमीन, एकनाथ पाटील, रघुनाथ मदने, आयुब मणियार, सिकंदर पटेल, प्रवीण कांबळे, नागसेन कामेगावकर, एम. पी. देशमुख, पुनीत पाटील, सुमीत खंडागळे, अमित जाधव, ज्ञानेश्वर सागावे, सुपर्ण जगताप, रमेश सूर्यवंशी, सुंदर पाटील, तबरेज तांबोळी, जमालाेद्दीन मणियार, सुरेश चव्हाण, अभिजित इगे, अकबर माडगे, युनुस शेख, करीम तांबोळी, अभिषेक पतंगे, विजय टाकेकर, व्यंकटेश पुरी, प्रमोद जोशी, रघुनाथ शिंदे, राजू गवळी, राज क्षीरसागर, अजित चिखलीकर, धनंजय शेळके, अबू मणियार, दिनेश गोजमगुंडे, समाधान गायकवाड, काशिनाथ वाघमारे, युसुफ बाटलीवाला, जय डगे, मैनोद्दीन शेख, आदी उपस्थित होते.