शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

टोल फ्री क्रमांक '१०९८' वर तक्रार; लातूरात चार महिन्यांत आठ बालविवाह रोखले

By हणमंत गायकवाड | Updated: January 1, 2024 18:23 IST

महिला व बालकल्याण विभागाकडे २५ तक्रारी

लातूर : महिला व बालकल्याण विभागाने लहान मुलांच्या अनुषंगाने तक्रार नोंदविण्यासाठी १०९८ हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. या टोल फ्रीवर सप्टेंबर २०२३ ते डिसेंबर २०२३ पर्यंत एकूण २५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात आठ तक्रारी बालविवाहाच्या अनुषंगाने होत्या. त्यावर तत्काळ दखल घेऊन होणारे बालविवाह रोखण्यात महिला व बालकल्याण विभागाला यश आले आहे.

लहान मुलांच्या अनुषंगाने मिसिंग, शारीरिक मारहाण, बालविवाह, समुपदेशन, बालकामगार व अन्य कारणांमुळे बालकांच्या समस्यांबाबत सप्टेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत १०९८ या टोल फ्री क्रमांकावर एकूण २५ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात आठ तक्रारी या बालविवाह होत असल्याच्या होत्या. त्या तात्काळ कार्यवाही करून बालविवाह रोखण्यामध्ये महिला व बालकल्याण विभागाला यश आले आहे. काल संपलेल्या डिसेंबर महिन्यात एकूण चार बालविवाह महिला व बालकल्याण विभागाच्या पथकाने समुपदेशन करून रोखले आहेत.

टोल फ्रीवर आलेल्या तक्रारींचे स्वरूप...टोल फ्रीवर आलेल्या तक्रारींचे स्वरूप वेगवेगळे आहे. काही तक्रारी तर आई-वडील मोबाइल घेऊन देत नाहीत, अशा स्वरूपाचीही तक्रार आहे. आठवी, नववीच्या मुलांच्या तक्रारी या टोल फ्रीवर असल्याचे महिला व बालकल्याण विभागातून सांगण्यात आले. वास्तविक पाहता हरवलेले, बालकामगार, भिक्षेकरी व अन्य कारणांच्या अनुषंगाने लहान मुलांचा छळ होत असेल तर टोल फ्रीवर तक्रार करता येते. मात्र, काही फेक तक्रारी या टोल फ्रीवर येत असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागातून देण्यात आली. १०९८ हा टोल फ्री क्रमांक असून त्यावर खरंच त्रास होत असेल तर तक्रार नोंदवावी, असे आवाहन महिला व बालकल्याण विभागाने केले आहे.

टोल फ्रीवर संपर्क साधा...बालकामगार ठेवले असतील, बालकांचे हक्क नाकारले जात असतील, तर महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने बाल संरक्षण कायद्यांतर्गत तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक दिला आहे. या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्यासाठी संपर्क साधता येईल. १०९८ असा नंबर आहे.- देवदत्त गिरी, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, लातूर

चार महिन्यांत टोल फ्रीवर अशा आल्या तक्रारी...हरवलेले : ६शारीरिक मारहाण :०३बालविवाह : ०८समुपदेशन : ०२बालकामगार : ०२इतर : ०४एकूण : २५

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी