सारसा गावात सर्वाधिक ५०रूग्ण...
लातूर तालुक्यातील सारसा गावात सर्वाधिक ५० कोरोनाचे रूग्ण आहेत. आर्वी १७, कासारगाव १२, वरवंटी १२, मुरूड ९, हरंगुळ खुर्द ६, चिखुर्डा ६, गादवड ३, पेठ ४, भोसा ४, महाराणा प्रतापनगर ६, पाखरसांगवी ९, महापूर ३, कव्हा, बोरी, खाडगाव प्रत्येकी २ रूग्ण आहेत. तसेच तालुक्यातील एकुण ३८ गावातील १९३ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी एक रूग्ण घरी आढळून नाही. त्याला १ हजारांचा दंड घेऊन कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
२६ हजारांचा दंड वसूल...
ग्रामीण भागात विनामास्क बसलेले व्यापारी, वाहनचालक, रस्त्यावर फिरणारे नागरिक, हातागाडा व्यावसायिक, फेरीवाले यांच्यावर गुरूवारी दंडात्मक कारवाई करण्यात आली. मोठ्या गावात राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत एकुण २६ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे नायब तहसीलदार राजेश जाधव यांनी सांगितले.