शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

वैद्यकीय शिक्षकांची सामूहिक रजा; वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांवर संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 18:28 IST

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण संघटनेच्या शिष्टमंडळासोबत अशासकीय भाषेचा वापर केल्याचा निषेध

लातूर : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण संघटनेच्या शिष्टमंडळासोबत अशासकीय भाषेचा वापर केल्याच्या निषेधार्थ विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमएसएमटीएच्या वतीने शुक्रवारी एक दिवस सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले.

यासंदर्भात अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांना निवेदन देण्यात आले. यावेळी एमएसएमटीएचे राज्याध्यक्ष डॉ. उदय मोहिते, जिल्हाध्यक्ष डॉ. उमेश कानडे, डॉ. नंदकुमार डोळे, डॉ. विमल होळंबे, डॉ. मेघराज चावडा, डॉ. मनीषा बिरादार, डॉ. सोनल पारेकर, डॉ. अश्विनी मते, डॉ. बालाजी उकरंडे, डॉ. वैशाली वहात्तरे, डॉ. केतकी चवंडा, डॉ. अनिता पवार, डॉ. सुषमा जाधव, डॉ. शीतल लाड, डॉ. एम. एस. कराळे, डॉ. पुष्कराज बिराजदार, डॉ. नामदेव सूर्यवंशी, डॉ. राम मुंडे, डॉ. किरण डवळे, डॉ. कांबळे, डॉ. डी.एस. जाधव, डॉ. जी.बी. सुडके, डॉ. एम.एम. कदम, डॉ. एस.व्ही. काटकर, डॉ. व्ही.टी. कलशेट्टी, डॉ. एस.ए. डोपे, डॉ. उमेश लाड, डॉ. विलास साळुंके, डॉ. ऋषिकेश हरिदास, डॉ. विनोद देशमुख, डॉ. जी.बी. जाजू, डॉ. उद्धव माने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आकस्मिक सेवा सुरु...एमएसएमटीएचे शिष्टमंडळ आपल्या न्याय मागण्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांना भेटण्यासाठी गुरुवारी गेले होते. तेव्हा सचिवांनी संघटनेच्या सदस्यांना अपमानित केले. या घटनेच्या निषेधार्थ आम्ही सामूहिक रजा आंदोलन करीत आहोत; मात्र आकस्मिक सेवा सुरु ठेवली आहे, असे संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. उदय मोहिते, जिल्हाध्यक्ष डॉ. उमेश कानडे यांनी सांगितले.

टॅग्स :doctorडॉक्टरlaturलातूर