शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !

By राजकुमार जोंधळे | Updated: June 12, 2025 06:00 IST

Latur News: अवघ्या पाच वर्षाचा लहान मुलगा औसा राेड परिसरात बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एकटाच फिरत असल्याचे आढळून आले. दीपक ढाेबळे यांनी सतर्कता दाखवत त्याला विचारणा केली. ताे वडिलांच्या शाेधात फिरत असल्याचे समजले. यावेळी प्रारंभी त्यांनी शाेधाशाेध केली. त्यानंतर डायल ११२ वर काॅल करुन माहिती दिली.

-राजकुमार जाेंधळेलातूर - अवघ्या पाच वर्षाचा लहान मुलगा औसा राेड परिसरात बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एकटाच फिरत असल्याचे आढळून आले. दीपक ढाेबळे यांनी सतर्कता दाखवत त्याला विचारणा केली. ताे वडिलांच्या शाेधात फिरत असल्याचे समजले. यावेळी प्रारंभी त्यांनी शाेधाशाेध केली. त्यानंतर डायल ११२ वर काॅल करुन माहिती दिली. शिवाजीनगर ठाण्याचे पाेलिस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. अडीच तासानंतर मुलाला पालकाकडे सुपूर्द करण्यात आले.

लातुरातील औसा राेड भागात राहणारे अमाेल ढवळे हे बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडले. दरम्यान, मुलगाही वडिलाच्या मागे निघाला. वडिलांना मुलगा हरवल्याची माहिती घराकडून मिळाली. त्यांनीही शाेधा-शाेध केली. इकडे औसा राेड परिसरात मुलगा एकाच फिरत असल्याचे स्थानिक नागरिक दीपक ढाेबळे यांना आढळून आले. त्यांनी तातडीने मुलाला जवळ घेत नाव, गाव, पत्ता विचारण्याचा प्रयत्न केला. मुलाचा फाेटाे काढून समाज माध्यमावर व्हायरल करत संपर्क साधण्याचे आवाहन केले. तर डायल ११२ वर काॅल करुन लहान मुलगा एकटाच फिरत असल्याची माहिती दिली. अवघ्या दहा मिनिटात शिवाजीनगर ठाण्याचे पाेलिस काॅन्स्टेबल नामदेव राठाे, पाेलिस काॅन्स्टेबल जिशान शेख हे औसा राेड येथे दाखल झाले. त्यांनी मुलाला ताब्यात घेत, मुलाचा फाेटाे पाेलिसांच्या ग्रुपवरही व्हायरल केला. मुलाच्या आई-वडिलांचा शाेध घेणे सुरु झाले. दरम्यान, तिकडे वडिल अमाेल ढवळे हे मुलगा हरवला म्हणून शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी बुधवारी रात्री १० वाजता धडकले. पाेलिसांनी आधीच पालकांची शाेधा-शाेध सुरु केली हाेती. पाेलिसांनी मुलाची भेट घालून दिल्यानंतर पालक अमाेल ढवळे यांचा जीव भांड्यात पडला. पाच वर्षाचा देवांश हरवला, नागरिक दिपक ढाेबळे यांनी प्रसंगावधानता दाखवत सतर्कता दाखवल्याने अवघ्या अडीच तासात मुलाला पालकाच्या स्वाधीन करता आहे.

शाेधाशाेध केली अन् पालकाचा शाेध लागला...डायल ११२ वर काॅल आला आणि आम्ही घटनास्थळी दहाव्या मिनिटात दाखल झाला. मुलाला ताब्यात घेत पाेलिस ठाण्यात आणले. त्यानंतर पालकाचा शाेध घेण्यास सुरुवात केली. तिकडे शाेध घेत असलेले पालक तक्रार देण्यासाठी ठाण्यात आले. मुलगा आणि पालकाची भेट झाली. अडीच तासानंतर मुलाला कुटुंबीयाकडे सुपूर्द करण्यात आले. - नामदेव राठाेड, पाेकाॅ, लातूर

टॅग्स :laturलातूरPoliceपोलिसMissingबेपत्ता होणं