शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मुलांनी आवडीच्या क्षेत्रात करीअरचा मार्ग निवडावा : प्रतीक्षा काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 18:19 IST

प्रतीक्षा काळे या वनविभाग परीक्षेत मुलीत राज्यात प्रथम आल्या आहेत

- आशपाक पठाण 

इंजिनिअरिंग व मेडीकल हे दोनच पर्याय आपल्याकडील मुले निवडतात़ बारावीनंतर करिअरसाठी अनेक मार्ग आहेत़ मुलींनी सर्वच क्षेत्रात भरारी घेतली आहे़ वाढत्या स्पर्धेच्या युगात कुठलेही क्षेत्र आता ठराविक लोकांसाठी राहिलेले नाही़ त्यामुळे तरूणांनी आवडीच्या क्षेत्रात करीअर करणे महत्त्वाचे आहे़ त्यात सर्वात उत्तम पर्याय सिव्हील सर्व्हिसेसचा असल्याचे मत लोकसेवा आयोगाच्या वनविभागाच्या परीक्षेत राज्यात मुलीत प्रथम आलेल्या प्रतीक्षा काळे यांनी व्यक्त केले़ 

शालेय, महाविद्यालयीन शिक्षण कुठे झाले?पहिली ते सातवी लातूरच्या लोकमान्य टिळक विद्यालय़ सातवी ते दहावी सरस्वती विद्यालय, ११ वी १२ वी राजर्षी शाहू महाविद्यालयात झाले़ त्यानंतर पुणे येथील कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिक शाखेतून पदवी मिळविली़ 

स्पर्धा परीक्षेकडे का वळलात?सिव्हील सर्व्हिसेस मध्येच करिअर करायचे ध्येय सातवी, आठवीतच ध्येय निश्चित केले होते़ लोकांमध्ये काम करण्याची इच्छा आहे़ करीअर आणि एज्युकेशन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत़ अभियांत्रिकीची पदवी घेताना तिच्याकडे रोजगार म्हणून मी कधीच पाहिले नाही़ 

मेडिकल इंजिनिअरिंगपेक्षा वेगळी वाट कशी शोधावी?आपल्याकडील मुलांना दोनच पर्याय माहित आहेत़ इंजिनिअरिंग, मेडिकलचा लातूर पॅटर्न आहे़ मध्यम, उच्चवर्गातील मुले सायन्सला जातात़ सर्वांनी एकाच मार्गावर न जाता सिव्हील सर्व्हीसेसकडे वळले पाहिजे़ हाच सर्वात उत्तम पर्याय आहे़ कोणतेही क्षेत्र ठराविक व्यक्तींसाठी नाही़ त्यामुळे मुलींनी सर्व क्षेत्रात  करीअर केले पाहिजे़ अभियांत्रिकीत केवळ मुले प्रवेश घ्यायचे़ आता मुलींचेही प्रमाण वाढले आहे़ माझ्या अनेक सहकारी अभियांत्रिकीत उच्च पदावर आहेत़  

कुटुंबाने दिले करिअर निवडीचे स्वातंत्र्य आई गृहिणी, वडील नानासाहेब काळे राजर्षी शाहू महाविद्यालयात प्राध्यापक आहेत़ लहानपणापासूनच घरात शैक्षणिक वातावरण़ करिअर निवडायचे स्वातंत्र्य दिल्याने मी त्याचा पुरेपूर वापर करून घेतला़ मुलींनी सिव्हील सर्व्हिसेसकडे जाऊ नये, असा अनेकांचा समज आहे़ मी मात्र अभियांत्रिकीची पदवी घेऊन युपीएससीचा अभ्यास करीत आहे़ वनविभागाच्या परीक्षेत यश मिळाले असले तरी माझे उद्दीष्ट आयएएस व्हायचे आहे़ लोकसेवा आयोगाची मी पहिल्यांदाच परीक्षा दिली़ यासाठी कुठलेही कोचिंग नव्हते़ घरीच अभ्यास करून परीक्षा दिली़ युपीएससीचा अभ्यास सुरू असल्याने परीक्षा सोपी गेली़ मुलाखतीतही मी टॉपर होते़ माझे ध्येय आयएएस व्हायचे आहे़ त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत़

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाState Governmentराज्य सरकारStudentविद्यार्थीlaturलातूर