काेराेना काळात अर्थकारण पूर्णत: काेलमडले आहे. याच काळात अल्प खर्चात लग्न उरकण्याला प्राधान्य देण्यात आले. गावा-गावात माेठ्या प्रमाणावर बालविवाह पार पडले. गावपातळीवर बालविवाह पार पाडण्यासाठी अल्पवयीन प्रेम प्रकरण हे नवे कारणही पुढे आले आहे. तर दाेन कुटुंबातील आपसात असलेले नातेसंबंधही कारणीभूत आहेत. ग्रामीण भागात उपवर झालेल्या मुलींचे लग्न उरकण्याची प्रथा आजही आहे. यामध्ये अज्ञात हे प्रमुख कारण आहे. शिवाय आर्थिक अडचणीतून या बालविवाहाला प्राधान्य दिले जाते. आपल्यावरील भार कमी करण्याच्या मानसिकतेतून अनेक पालक आपल्या मुलींचा विवाह वय नसतानाही लावून देतात. यातील ३५ बालविवाह राेखण्यात महिला व बालकल्याण विभागाला यश आले आहे.
पटसंख्या कमी झालेली मुली मग गेल्या कुठे...
सध्याला सुुरू झालेल्या शाळांमध्ये ३ लाख १० हजार विद्यार्थ्यांपैकी १ लाख ३५ हजार मुलींची तर १ लाख ७५ हजार मुलांची संख्या आहे. इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ ६ हजार ५०० च्या घरात आहे. पटसंख्या कमी झालेल्या मुली नेमक्या गेल्या कुठे, असा प्रश्न आता शाळांना पडला आहे.
अल्पवयीन मुलींच्या गळ्यात आता मंगळसूत्र...
अल्पवयीन मुलींचे लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे; मात्र यानंतरही काही पालकांकडून आपल्या मुलींचा विवाह पार पाडला जात असल्याचे दिसून येत आहे.
परिणामी, उदगीर तालुक्यातील एका गावात असाच बालविवाह राेखण्यात बालसंरक्षण विभागाला यश आले. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आर्थिक विवंचना हेच कारण...
बालविवाह पार पाडण्यात आर्थिक अडचणी, विवंचना हेच प्रमुख कारण असल्याचे समाेर आले आहे. यात प्रामुख्याने बालविवाह उरकले जात आहेत.
अल्पवयीन मुलींना पहिल्यांदाच आलेले स्थळ कसे नाकारायचे, या मानसिकतेतून पालक नकार देत नाहीत. दारात आलेला पाहुणा कसा परत करायचा...यातून हे बालविवाह पार पाडले जात आहेत.
जानेवारी ते डिसेंबर २०२० मध्ये १७ आणि जानेवारी ते १५ जुलै २०२१ अखेर १८ बालविवाह झाल्याची नाेंद आहे. हे विवाह राेखण्यात महिला व बालकल्याण विभागाला यश आले आहे. यासाठी गावपातळीवर बालसंरक्षण समित्यांची स्थापना करण्यात येत आहे.
- धम्मानंद कांबळे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, लातूर.
ज्या कुटुंबात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. शिवाय, आर्थिक अडचणी असलेल्या कुटुंबात माेठ्या प्रमाणावर बालविवाह पार पडतात. स्थलांतरीत कुटुंबात अशा प्रकारचे विवाह हाेत असल्याचे समाेर आले आहे. केवळ अज्ञान हेच प्रमुख कारण बालविवाहासाठी पाेषक ठरले आहे.
- गणपतराव तेलंगे, लातूर.