शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिनेस्टाइल पाठलाग करून ८ लाखांचा गुटखा पकडला

By राजकुमार जोंधळे | Updated: August 19, 2023 05:42 IST

एकास अटक : औसा ठाण्यात गुन्हा दाखल...

राजकुमार जाेंधळे,  औसा (जि. लातूर) : लगतच्या धाराशिव जिल्ह्यातून औशाकडे चाेरट्या मार्गाने गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पाेचा ३० किलाेमीटर सिनेस्टाइल पाठलाग करून, आठ लाखांचा गुटखा भादा पाेलिसांनी शिवली येथे पकडला असून, एकाला अटक केली आहे. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, औसा येथील सज्जाद शेख हा चाेरट्या मार्गाने बंदी असलेला गुटखा, पानमसाल्याची वाहतूक करत होता. दरम्यान, मध्यरात्री धाराशिव जिल्ह्यातून टेम्पो (एम.एच. २४ जे. ६९२४) पानमसाला आणि इतर कंपनीच्या जवळपास ३ लाख ७७ हजारांचा गुटख्याची चाेरट्या मार्गाने वाहतूक केली जात असल्याची माहिती खबऱ्याने पाेलिसांना दिली. या माहितीच्या आधारे भादा पाेलिसांनी लातूर-धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर शिवली येथे सापळा लावला. धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीतून आलेला टेम्पाे लातूर जिल्ह्याच्या हद्दीतील शिवलीत येत असल्याचे दिसून आले. पाेलिसांना गुंगारा देत चालकाने टेम्पाे औशाच्या दिशेने पळविला. भादा पोलिसांनी तब्ब्ल ३० किलाेमीटर पाठलाग करून गुटख्यासह टेम्पो औसा टी-पाॅइंटवर पकडला. यावेळी गुटख्यासह एकाला अटक करण्यात आली. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सपोनि. बाळासाहेब डोंगरे, सहायक फौजदार देवकर, हेकॉ. जनार्दन फड यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी