लातूर : तालुक्यातील सारसा येथील रहिवासी चंदरराव निवृत्ती भिसे (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी ९ वाजता सारसा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी उपसरपंच गणेश भिसे यांचे ते वडील होत.
हौसाबाई खटके
हरंगुळ बु. : लातूर तालुक्यातील हरंगुळ बु. येथील हौसाबाई विनायक खटके (६२) यांंचे शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी १० वाजता अतिरिक्त एमआयडीसी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खटके यांच्या त्या मातोश्री होत.