शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

संधीचे केलं सोनं! बेस्ट पिचर ज्योती पवारची आशिया कपसाठी भारतीय बेसबॉल संघात निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 15:11 IST

लातूरच्या ज्योती पवारची आंतरराष्ट्रीय झेप; घरची परिस्थिती साधारण असल्याने आर्थिक पाठबळाची गरज

- महेश पाळणेलातूर : प्रभावी पिचिंगच्या जोरावर अनेकवेळा मैदाने गाजविणाऱ्या लातूरच्या ज्योती पवारने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत बेसबॉल खेळात उड्डाणे कायम ठेवली आहेत. हाँगकाँग येथे होणाऱ्या महिलांच्या एशियन कप स्पर्धेत भारतीय संघात आपली निवड पक्की करून दुसऱ्यांदा ही किमया साधली आहे. 

औसा तालुक्यातील नांदुर्गा तांडा येथील रहिवासी असणारी ज्योती व्यंकट पवार हिने बेसबॉल खेळात आपली लय कायम राखत हे यश गाठले आहे. उदगीरच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयात बीपीएडचे शिक्षण घेणाऱ्या ज्योतीने राष्ट्रीय स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाच्या सराव शिबिरात निवड पक्की केली होती. तेथेही उत्कृष्ट प्रदर्शन करीत भारतीय संघात आपली निवड सार्थक ठरविली आहे. हाँगकाँग येथे २१ मे ते २ जून दरम्यान होणाऱ्या एशियन बेसबॉल स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तिला प्रा. अनिरुद्ध बिराजदार, दैवशाला जगदाळे, रत्नराणी कोळी, शिवाजी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

राज्यातील बेस्ट पिचर...उत्कृष्ट पिचर म्हणून राज्यभरात ज्योतीची छाप आहे. शालेय जीवनात जिजामाता व महाविद्यालयीन जीवनात राजर्षी शाहू महाविद्यालयाकडून खेळताना तिने अनेकवेळा लातूरला पदके मिळवून दिली आहेत. यापूर्वी चीन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यासह १६ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत पदकांची लयलूट केली आहे.

आर्थिक पाठबळाची गरज...घरची परिस्थिती साधारण असल्याने ज्योतीला अनेकवेळा आर्थिक चणचण खेळाच्या निमित्ताने जाणवली आहे. एका राष्ट्रीय स्पर्धेत तर तिच्या आईने आपले दागिने विकून तिला स्पर्धेला पाठविली होते. हाँगकाँग येथे होणाऱ्या स्पर्धेसाठीही तिला लाखभर रुपयांचा खर्च आहे. यात प्रवास खर्च, व्हिसा शुल्क, कॅम्प शुल्क, गणवेश व खेळाच्या साहित्याचा समावेश आहे.

संधीचे केले सोनं...यापूर्वी ज्योतीची भारतीय संघात निवड झाली होती. मात्र, त्यावेळी महिलांच्या स्पर्धा रद्द झाल्या होत्या. त्यानंतर २०१९ मध्ये तिने चीन येथे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. आता २०२३ मध्ये होणाऱ्या एशियन स्पर्धेसाठी तिची निवड झाल्याने दुसऱ्यांदा भारतीय संघाकडून खेळण्याची संधी तिला मिळाली आहे.

टॅग्स :laturलातूरBaseballबेसबॉलIndiaभारत