शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चक दे लातूर! युरोप टूरसाठी लातूरचा व्यंकटेश भारतीय हॉकी संघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 19:42 IST

अभिमानास्पद! फाॅरवर्ड खेळणारा व्यंकटेश गोल करण्यात तरबेज असून, विरोधी संघाला चकवा देत मैदानावर हॉकी स्टीकच्या मदतीने बाॅल पळविण्यात पटाईत आहे.

- महेश पाळणेलातूर : प्रतिस्पर्धी खेळाडूला चकवा देत गोलमध्ये रुपांतर करण्याची किमया साधणाऱ्या लातूरच्या व्यंकटेश धनंजय केंचे याने हाॅकीत मैदान मारले असून, नेदरलँड येथे होणाऱ्या युरोप टूरसाठी भारतीय संघात आपले स्थान पक्के केले आहे. त्यामुळे आता लातुरातून हाॅकीसाठी ‘चक दे लातूर’ असा आवाज घुमू लागला आहे.

चाकूर तालुक्यातील घरणी येथील व्यंकटेश केंचे याने नुकत्याच झाशी येथे झालेल्या राष्ट्रीय हाॅकी स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत अनेक गोल केले होते. या बळावरच त्याची ८ ते २० जुलैदरम्यान नेदरलँड येथे होणाऱ्या वरिष्ठ गटातील युरोप टूरसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. सध्या तो बंगळुरू येथे भारतीय संघाच्या सराव शिबिरात सामील आहे. पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीत प्रशिक्षण घेणाऱ्या लातूरच्या व्यंकटेशने हाॅकी खेळात अनेक वेळा आपले कौशल्य सिद्ध केले आहे. अकरा वर्षांपासून तो क्रीडा प्रबोधिनीत हाॅकी खेळाचे प्रशिक्षण घेत आहे. प्रथमच भारतीय संघात त्याची निवड झाल्याने हाॅकी खेळातही लातूर पॅटर्न पुढे येत आहे. त्याला माजी ऑलिम्पियन अजित लाकर, सागर कारंडे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाचे क्रीडा वर्तुळातून कौतुक होत आहे.

फॉरवर्ड म्हणून खेळणारनुकतीच युरोप टूरसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून, २० जणांच्या या चमूमध्ये लातूरच्या व्यंकटेशची फाॅरवर्डस् म्हणून निवड झाली आहे. यापूर्वी त्याने बांगलादेश येथे क्लब टुर्नामेंट खेळली होती. यासह ज्युनिअर व सिनिअर गटात २० वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवून सुवर्ण व कांस्य पदके पटकावली आहेत. राज्य स्पर्धेतही त्याने अनेकवेळा मैदान गाजविले असून, ७ वेळा प्रथम येण्याचा बहुमानही पटकावला आहे. ४ वेळा त्याने ज्युनिअर गटात भारतीय संघाच्या सराव शिबिरात सहभाग नोंदविला आहे.

गोल करण्यात तरबेजफाॅरवर्ड खेळणारा व्यंकटेश गोल करण्यात तरबेज असून, विरोधी संघाला चकवा देत मैदानावर हॉकी स्टीकच्या मदतीने बाॅल पळविण्यात पटाईत आहे. त्याचे हे कौशल्य संघाला अनेकवेळा फायद्याचे ठरले आहे. युरोप टूरमध्ये आयर्लंड, नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स, इंग्लंड आदी संघांबरोबर भारताचे सामने होणार आहेत.

ऑलिम्पिक खेळण्याचे ध्येयमाजी भारतीय हाॅकी कर्णधार धनराज पिल्ले माझा आदर्श असून, भविष्यात ऑलिम्पिक खेळण्याचे ध्येय आहे. युरोप टूरमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करण्याचा मानस आहे. या निवडीत आई-वडिलांसह कुटुंब व प्रशिक्षकाचेही योगदान आहे.- व्यंकटेश केंचे, हाॅकीपटू

टॅग्स :laturलातूरHockeyहॉकी