राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. यानंतर राज्यात विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणात काही मध्यस्थ कार्यरत असल्याचे व त्यांचे बड्या हस्तींशी लागेबांधे असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
यानुसार काही केंद्रीय तपास यंत्रणेने यासंबंधी चौकशी सुरू केली होती. या तथाकथित बदली प्रकरणाशी संबंधित तालुक्यातील शेळका धानोरा येथील मूळचे रहिवासी असलेल्या व या प्रकरणी मध्यस्थ म्हणून नाव समोर आलेल्या एका मध्यस्थाच्या नातेवाइकांकडे तपास यंत्रणेच्या गोपनीय पथकाने चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.
सदर मध्यस्थ अनेक वर्षांपासून गावात वास्तव्यास नसला तरी वास्तव्यास असलेल्या त्याच्या आईकडे चौकशी केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सदर तपास यंत्रणा सीबीआय होती की ईडी हे मात्र समजू शकले नाही.