शिक्षकांचे वेतन वेळेत होत नाही. त्यामुळे शिक्षकांची तारांबळ होत आहे. डीसीपीएस शिक्षकांच्या वेतन कपातीचा हिशेब प्रत्येक शिक्षकनिहाय, केंद्रनिहाय तालुकास्तरावर दिला जात नाही. त्यामुळे तालुकानिहाय होणाऱ्या कॅम्पमध्ये माहिती देणे सोईचे होईल. सन २०२०-२१ व २०२१-२२ चा तालुकानिहाय आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम ५ सप्टेंबर रोजी घेण्यात यावा. प्रलंबित देयकाची रक्कम दरमहा वरिष्ठ कार्यालयाकडून मागवून घेऊन सेवा ज्येष्ठतेनुसार देण्यात यावे. बाला उपक्रमाअंतर्गत काम करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात यावा. कोरोना काळात सेवा देणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र द्यावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस संजय सूर्यवंशी, निलंगा तालुका शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन अरुण सोळुंके, अध्यक्ष संजय कदम, सरचिटणीस गणेश गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी राम सगरे, बालाजी येळीकर, कालिदास बिरादार, विष्णुकांत धुमाळ, बी.जी. वाघमारे, सहदेव माने, भास्कर सोळुंके, इनामदार खदीर, डी.एम. लखणे, विठ्ठल गोमसाळे, श्याम मेश्राम, सहदेव माने, भीमराव सूर्यवंशी, बी.एम. पाटील, सुनील टोंपे, सुरेश जाधव, ओम गेंदेवाड, रमेश भदरगे, एम.बी. गिरी, वसंत पाटील, संजय जमादार, सत्यप्रकाश दरेकर आदी उपस्थित होते.