शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी शाळांत नवोपक्रम केंद्र; खेड्यातील मुलांचा वैज्ञानिक दृष्टीकोन होणार प्रगल्भ!

By हरी मोकाशे | Updated: July 12, 2023 19:39 IST

लातूर जिल्ह्यातील २० जिल्हा परिषद शाळांमध्ये भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम विज्ञान- तंत्रज्ञान आणि नवोपक्रमशील केंद्र सुरु करण्यात आले आहेत.

लातूर : सध्या जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांमध्ये गुणवत्तेची स्पर्धाच आहे. या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आघाडीवर रहावेत. तसेच त्यांच्यातील वैज्ञानिक जाणिवा अधिक प्रगल्भ व्हाव्यात म्हणून शासनाने जिल्ह्यातील २० शाळांमध्ये भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम विज्ञान- तंत्रज्ञान आणि नवोपक्रम केंद्र सुरु केले आहेत. त्यामुळे या शाळांतील मुले जवळपास २५६ प्रयोग तयार करुन अध्ययन करीत आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन अन् गणितीय क्रियांची माहिती वाढावी म्हणून शासनाच्या वतीने जिल्ह्यातील २० जिल्हा परिषद शाळांमध्ये भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम विज्ञान- तंत्रज्ञान आणि नवोपक्रमशील केंद्र सुरु करण्यात आले आहेत. त्यासाठी राज्य शासनाने इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, गणितीय क्रियांसाठीचे साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. त्यातून जवळपास २५६ प्रयोग तयार होतात. या केंद्रामुळे प्रत्यक्ष अनुभव घेत विद्यार्थी साहित्यकृती तयार करीत आहेत.

सात तालुक्यातील शाळांचा समावेश...भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम सायन्स टेक्नॉलॉजी ॲण्ड इनोव्हेशन सेंटर हे जिल्ह्यातील सात तालुक्यातील एकूण २० जिल्हा परिषद शाळांमध्ये आहेत. त्यात गुडसूर, लोहारा (ता. उदगीर), महापालिका शाळा क्र. ९, शासकीय वसाहत, तांदुळजा, बोरी, वांजरखेडा, भोईसमुद्रगा (ता. लातूर), जवळगा, बोरोळ, देवणी (ता. देवणी), साकोळ, अंकुलगा राणी (ता. शिरुर अनंतपाळ), खरोळा, पानगाव (ता. रेणापूर), चाकूर, नळेगाव (ता. चाकूर), निटूर, राठोडा, माळेगाव (ता. निलंगा) या शाळांचा समावेश आहे.

इंद्रधनुष्य निर्मिती कशी होते?...या केंद्रात इंद्रधनुष्य निर्मिती कशी होते, वीज कशी तयार होते, मॅग्नेटिक कार, साधे तारा यंत्र, एलईडी, चार पायांचा रोबाेट, ड्रोन, पवनचक्की अशा एकूण २५६ प्रयोगाचे साहित्य आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक आणि गणितीय दृष्टीकोन वाढीस मदत होत आहे.

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव...ही प्रयोगशाळा अत्यंत उत्कृष्ट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गणितीय आणि वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट होतात. प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पाठांतर कमी होण्यास मदत होत आहे.- डॉ. सतीश सातपुते, उपक्रमशील शिक्षक.

 

टॅग्स :laturलातूरzp schoolजिल्हा परिषद शाळाEducationशिक्षण