लातूर : आयएमए, लातूर आणि विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्यावतीने जागतिक अवयवदान दिन साजरा करण्यात आला.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षक डॉ. संतोष डोपे होते. यावेळी ‘आयएमए’च्या अध्यक्ष डॉ. सुरेखा काळे यांनी अवयवदानाचे महत्त्व सांगितले.
लातूर येथील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अजय ओहोळ यांनी त्वचादानाचे महत्त्व सांगितले, तर डॉ. शिवाजी काळगे यांनी नेत्रदानाबद्दल, डॉ. ओमप्रकाश भोसले यांनी हृदयदान, डॉ. विद्यासागर बाहेती यांनी किडनीदानाबद्दल मार्गदर्शन केले. आयएमए सचिव डॉ. हनुमंत किनीकर यांनी आभार मानले.
सूत्रसंचालन डॉ. विमल डोळे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. शोभा निसाले, डॉ. नीलिमा देशपांडे, डॉ. श्वेता काटकर, डॉ. सुवर्णा कोरे, डॉ. रामेश्वरी अलाहाबादे, डॉ. परमेश्वर सूर्यवंशी, डॉ. शैलेश चव्हाण, डॉ. मोहिनी गानू, डॉ. राजश्री सावंत, डॉ. दीपा पुरी, डॉ. केतकी चवंडा, डॉ. स्वामी, डॉ. किरण होळीकर, डॉ. अपूर्वा चेपुरे, मस्के आदींसह डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.