मुरुड येथील कोविड केअर सेंटरमध्ये वैद्यकीय यंत्रसामुग्री, औषधे, इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होऊ नये. याची योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना आ. देशमुख यांनी केल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली. यानंतर लातूर तालुक्यातील तांदुळजा गावाला भेट देऊन येथील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी स्वतःची आणि कुटुंबियांची योग्य ती काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नका. ४५ वर्षांवरील अधिकाधिक नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन आ. देशमुख यांनी केले आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी सुनील यादव, तहसीलदार स्वप्नील पवार, लातूर तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. अशोक सारडा, गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, दिलीप नाडे, डाॅ. दिनेश नवगिरे, प्राची हरीदासा, सहायक पोलिस निरीक्षक धनंजय डोणे, मुरुडचे सरपंच अभयसिंह नाडे, उपसरपंच आकाश कणसे आदींची उपस्थिती हाेती.
घंटागाडीचे लोकार्पण...
मुरुड येथे १४ व्या वित्त आयोगातून ३ आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी मूलभूत सुविधेतून २ अशा ५ घंटा गाड्यांचे लोकार्पण आ. धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक नियमांचे पालन करीत अत्यंत साधेपणाने हे लोकार्पण झाले. ५ घंटागाड्या उपलब्ध झाल्यामुळे ग्रामस्थांचा कचरा नियोजनाचा मुलभूत प्रश्न मार्गी लागणार आहे.