शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या दराेडेखाेरांच्या टाेळीला पकडले!

By राजकुमार जोंधळे | Updated: June 5, 2023 15:27 IST

तिघा सराईतांना अटक, दागिन्यांसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त

लातूर : विविध जिल्ह्यात घरफाेड्या करत धुमाकूळ घालणाऱ्या दराेडेखाेरांच्या अट्टल टाेळीतील तिघांच्या मुसक्या लातूर पाेलिसांनी रविवारी आवळल्या आहेत. बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातून तिघांना उचलण्यात आले आहे. सात घरफाेड्यांची कबुली दिली असून, सोमवारी साेन्या-चांदीच्या दागिन्यांसह, राेख रक्कम असा एकूण ४ लाख ८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील चोरी, घरफोड्यांसह दराेड्यांच्या गुन्ह्याचा उलगडा करण्याचे आदेश दिले असून, पाेलिसांनी रेकाॅर्डवरील गुन्हेगारांचा शाेध घेतला. शिवाय, जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील गुन्हेगारांचा डेटा कलेक्ट केला. दरम्यान, खबऱ्याने पाेलिसांना माहिती दिली. याच्या आधारे गुन्हेगारांचा माग काढला. लातुरात घरफाेड्या करणारे बीड, अहमदनगर जिल्ह्यात असल्याची माहिती समाेर आली. या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बीड, अहमदनगर जिल्ह्यात रवाना झाले. स्थानिक खबऱ्यांची मदत घेत घरफाेडीतील तिघा अट्टल गुन्हेगारांना उचलण्यात आले. अमोल धर्मा इगवे (वय २८, रा. उमापूर ता. गेवराई जि. बीड), गणेश मिलिंद सूर्यवंशी (वय २३, रा. घुमेगाव, ता. गेवराई जि. बीड) आणि विकास सुनील घोडके (वय २७, रा. शेवगाव जि. अहमदनगर) असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. चाैथा साथीदार फरार झाला असून, सोमवारी सात घरफाेड्या केल्याची कबुली दिली.

यांच्या पथकाने केली कारवाई...ही कामगिरी जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, सपोनि. व्यंकटेश आलेवार, खुर्रम काझी, यशपाल कांबळे, राजेश कंचे, संतोष देवडे, मोहन सुरवसे, रवी गोंदकर, मनोज खोसे, राहुल कांबळे, नकुल पाटील यांच्या पथकाने केली.

शिवाजीनगर, एमआयडीसी हद्दीमध्ये केल्या घरफाेड्या...लातुरातील शिवाजीनगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत तीन घरफोडी आणि एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीत चार घरफोड्या केल्याची कबुली ताब्यातील गुन्हेगारांनी दिली आहे. घरफोडीतील चाेरलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि राेख रक्कम असा एकूण ४ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर