शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

पतीच्या खून प्रकरणी प्रियकरासह पत्नीस जन्मठेप, लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 19:49 IST

आपल्याच शेतात सालगडी म्हणून काम करणा-या एका तरुणासोबत प्रेमसंबंध ठेवून त्यातून आलेल्या अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या पतीचा प्रियकराच्या मदतीने धारदार शस्त्राने खून केल्याप्रकरणी अश्विनी अरुण देशमुख (रा. चिकलठाणा, ता. लातूर), सालगडी सचिन प्रल्हाद कांबळे याला लातूरच्या जिल्हा व सत्र न्यायालय (क्र. २) चे न्यायाधीश ए.एन. पाटील यांनी दोन हजारांच्या दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

लातूर : आपल्याच शेतात सालगडी म्हणून काम करणा-या एका तरुणासोबत प्रेमसंबंध ठेवून त्यातून आलेल्या अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या पतीचा प्रियकराच्या मदतीने धारदार शस्त्राने खून केल्याप्रकरणी अश्विनी अरुण देशमुख (रा. चिकलठाणा, ता. लातूर), सालगडी सचिन प्रल्हाद कांबळे याला लातूरच्या जिल्हा व सत्र न्यायालय (क्र. २) चे न्यायाधीश ए.एन. पाटील यांनी दोन हजारांच्या दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली. लातूर तालुक्यातील चिकलठाणा येथील रहिवासी अरुण नानासाहेब देशमुख यांचा मृतदेह त्यांच्या शेतात १६ मार्च २०१५ रोजी आढळून आला. त्यांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. दरम्यान, सदर घटनेत मयत अरुण नानासाहेब देशमुख यांचे भाऊ नारायण देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात मयत अरुण देशमुख यांची पत्नी अश्विनी देशमुख व त्यांचा सालगडी सचिन प्रल्हाद कांबळे यांच्या विरोधात गु.र.नं. ४८/२०१५ कलम ३०२, १०९ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीत म्हटले होते, अश्विनी देशमुख व सचिन कांबळे यांच्यातील असलेल्या अनैतिक संबंधास मयत अरुण देशमुख अडसर ठरत असल्यामुळे अश्विनीच्या सांगण्यावरून सचिन याने अरुण देशमुख यांचा खून केला होता. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप आलापूरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.आर. सय्यद यांनी या प्रकरणाचा तपास करून दोघांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र. २) ए.एन. पाटील यांच्या न्यायालयासमोर चालविण्यात आला. सरकार पक्षाच्या वतीने एकूण १४ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये फिर्यादी नानासाहेब देशमुख व डॉक्टरांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने सरकार पक्षाच्या वतीने सादर केलेला पुरावा ग्राह्य धरून आरोपी अश्विनी अरुण देशमुख व सालगडी सचिन प्रल्हाद कांबळे यांना कलम ३०२, १०९ भादंवि अन्वये जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता संतोष वसंतराव देशपांडे यांनी कामकाज पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी, समन्वयक, पोलीस हवालदार आर.टी. राठोड, दिलीप बा. नागराळे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Courtन्यायालयlaturलातूर