शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कर्करुग्णांची परवड थांबली; लातूरच्या सुपरस्पेशालिटीत माेफत किमोथेरपी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 18:21 IST

रुग्ण-नातेवाइकांना दिलासा : नियमित वैद्यकीय सुविधेस प्रारंभ

लातूर : शहरातील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुमारे पाच महिन्यांपासून कर्करोग निदान व शस्त्रक्रियेची सुविधा सुरू करण्यात आली होती. मात्र, किमोथेरपीची सेवा नव्हती. परिणामी, रुग्णांना किमोथेरपीसाठी अन्य रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत होती. आठवड्याभरापासून ही सुविधा सुरू करण्यात आल्याने कर्करुग्णांची परवड थांबली आहे.

दुर्धर कर्करोगाच्या लक्षणांचे वेळीच निदान न झाल्यास वेदनेबरोबर खर्चही वाढतो. त्यामुळे शहरातील अतिविशेषोपचार रुग्णालयात पाच महिन्यांपासून कर्करोग निदान विभाग सुरू करण्यात आला. प्रधानमंत्री जनआरोग्य व महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार सुरू केले. त्यात नियमित तपासणी, निदान व शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत.

दोन रुग्णांवर किमोथेरपीसुपरस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये दोन रुग्णांवर शस्त्रक्रियेनंतर किमोथेरपी करण्यात आली. कर्करोगतज्ज्ञ डॉ. अमोल कोटलवार यांच्या निरीक्षणाखाली ही वैद्यकीय सेवा देण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते, विशेष कार्य अधिकारी डॉ. सुनील होळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन जाधव, डॉ. उद्धव माने, डॉ. मेघराज चावडा, सर्जन डॉ. गणेश स्वामी, डॉ. सुमित वाघमारे, डॉ. गौरव बिराजदार, अधिसेविका अमृता पोहरे उपस्थित होते.

१० हजारांपर्यंत खर्चकर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर किमोथेरपी लागते. ती आता सुपरस्पेशालिटीमध्ये सुरू करण्यात आली आहे. एका किमोथेरपीस किमान १० हजारांपर्यंत खर्च येतो. येथे ही सेवा मोफत आहे, असे कर्करोगतज्ज्ञ डॉ. अमोल कोटलवार यांनी सांगितले.

कर्करोगाच्या वेदना अधिक होऊ लागल्यानंतर रुग्णांची धावपळ होते. त्यामुळे ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गोरगरीब कुटुंबातील रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे.डॉ. उदय मोहिते, अधिष्ठाता

कर्करोगाचे निदान, उपचारावर खासगी अधिक खर्च होतो. त्यामुळे सुपरस्पेशालिटीमध्ये औषधी, आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांची परवड थांबणार आहे.- डॉ. सुनील होळीकर, विशेष कार्य अधिकारी

टॅग्स :cancerकर्करोगlaturलातूरHealthआरोग्य