शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

गुन्हेगारांना दणका; सात जण तडीपार! 

By राजकुमार जोंधळे | Updated: April 3, 2024 20:39 IST

पोलिसांची कारवाई : ७०० जणांविरोधात आवळला कायद्याचा फास 

लातूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा पाेलिसांनी राबविलेल्या काेम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून अनेक फरार गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दाेन सराईत गुंडांच्या टाेळ्यातील सहाजणांसह इतर रेकाॅर्डवरील सात गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करत त्यांच्याविराेधात कायद्याचा फास आवळला आहे. यातून गुन्हेगारांना निवडणुकीच्या ताेंडावर पाेलिसांनी चांगलाच हिसका दाखवला आहे.

गत दाेन आठवड्यांत राबविण्यात आलेल्या काेम्बिंग ऑपरेशनमध्ये ठिकठिकाणी सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर धाडी टाकण्यात आलेल्या आहेत. शिवाय, विविध कलमान्वये स्वतंत्र ७०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या धाडसत्रात तब्बल सव्वा काेटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. काेम्बिंग ऑपरेशन, रूटमार्च, गावभेटी, मतदान केंद्राची पाहणी, गुन्हेगार आणि सार्वजिनक शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारांविराेधात प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी दिले हाेते. त्यानुसार १ फेब्रुवारी ते ३१ मार्चअखेर ३१४ व्यक्तीविराेधात १२० जुगाराचे गुन्हे दाखल केले आहेत. यावेळी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. देशी-विदेशी दारू, हातभट्टीची वाहतूक आणि निर्मिती करणाऱ्यांविराेधात ५७५ जणांविरुद्ध ५६७ गुन्हे दाखल केले आहेत. यातून ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रेकाॅर्डवरील फरार पाच आराेपींना अटक...लातूर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या काेम्बिंग ऑपरेशनमध्ये फरार झालेल्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर रेकाॅर्डवरील अनेक गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक नाेटिशी बजावण्यात आलेल्या आहेत.

सर्वाधिक कारवाया लातुरातील ठाण्यात...लातूर जिल्ह्यातील २३ पाेलिस ठाण्याकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविराेधात कारवाईचा धडका सुरू केला आहे. लातुरातील पाेलिस ठाण्यांनी सर्वाधिक कारवाई केली असून, त्यापाठाेपाठ उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा ठाण्यांनी केली आहे. सहा उपविभागाअंतर्गत गुन्हेगारांवर कारवाई माेहीम हाती घेण्यात आली आहे.

एमपीडीए कायद्यानुसार  सात जणांविराेधात कारवाई...महाराष्ट्र झाेपडपट्टी दादा (एमपीडीए) कायद्यानुसार आतापर्यंत सात जणांवर तडीपारीची कारवाई केली आहे. शिवाय, रेकाॅर्डवरील गुन्हेगारांवर पाेलिस कारवाई करत आहेत. सार्वजिनक शांतता भंग करणाऱ्या, वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्यांवर पाेलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

- साेमय मुंडे, पाेलिस अधीक्षक

टॅग्स :laturलातूर