शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

औशात भाजपचा पॉवर शो! माजी आमदारांसह काँग्रेस-उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या हाती कमळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 19:57 IST

औशातील दिग्गज नेते आता भाजपात; माजी आमदारांपासून सरपंचांपर्यंत सर्वांनी धरलं कमळ

-महेबूब बक्षीऔसा(लातूर): जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच औसा मतदारसंघात भाजपने विरोधकांना धोबीपछाड दिला आहे. आमदार अभिमन्यू पवार यांनी केलेल्या राजकीय 'सर्जिकल स्ट्राईक'मुळे उद्धवसेना आणि काँग्रेसचे मोठे पदाधिकारी भाजपात सामील झाले आहेत. यामुळे औसा तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

मुंबईत झालेल्या एका विशेष सोहळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यामध्ये उद्धवसेनेचे गटाचे माजी आमदार दिनकरराव माने, संतोष सूर्यवंशी, आबासाहेब पवार यांच्यासह काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अमरसिंह भोसले यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नेत्यांचे स्वागत केल्याने या प्रवेशाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

विरोधक संपवण्याची खेळी?आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या कार्यकाळात आतापर्यंत दोनवेळा विरोधात राहिलेल्या माजी आमदारांना आपल्या गोटात खेचून आणण्यात यश मिळवले आहे. केवळ मोठे नेतेच नव्हे तर सरपंच, चेअरमन आणि व्यापारी वर्गालाही त्यांनी भाजपात आणले आहे. यामुळे औसा मतदारसंघात आता भाजपची पकड अधिक घट्ट झाली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मोठी आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५laturलातूरabhimanyu pawarअभिमन्यू पवारBJPभाजपा