गृहमंत्री अनिल देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवायचे. तसेच त्यांना दरमहा शंभर कोटी रुपये गोळा करण्याचे उद्दिष्ट द्यायचे, असा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. हा प्रकार धक्कादायक असून, त्याची चौकशी करण्यात यावी. गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशा आशयाचे फलक घेऊन भारतीय जनता पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. या आंदोलनात सरचिटणीस मनीष बंडेवार, ॲड. शैलेश गोजमगुंडे, शिरीष कुलकर्णी, अजितसिंह पाटील कव्हेकर, ज्योतिराम चिवडे, स्वातीताई जाधव, मीनाताई भोसले, वर्षाताई कुलकर्णी, दिग्विजय काथवटे, विपुल गोजमगुंडे, सुरेश राठोड, परमेश्वर महांडुळे, सौदागर पवार, गणेश गवारे, हेमंत जाधव, विजय अवचारे, गिरीश तुळजापुरे, गोटू केंद्रे, पृथ्वी बायस, अनिल पतंगे, अनंत गायकवाड, देवा गडदे, संतोष तिवारी, अर्चनाताई आल्टे, आफरीन खान, शशिकांत हांडे, मधुसूदन पारिख, ललित तोष्णीवाल, विकास घोडके, पृथ्वीराज कुरे, शोभाताई कोंडेकर, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपची लातुरात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:17 IST