शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

लातूरमध्ये पुन्हा भाजप वरचढ;काँग्रेसला आत्मचिंतनाचा धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 18:09 IST

उमेदवार बदलूनही भाजपच्या सुधाकर शृंगारे यांना २ लाख ८९ हजार १११ इतके प्रचंड मताधिक्य 

ठळक मुद्देलोकसभा मतदारसंघात भाजपचा सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय भाजपा उमेदवार सुधाकर शृंगारे हे राजकारणात नवखे होते. 

- हणमंत गायकवाड 

प्रदीर्घ काळ काँग्रेसचे प्राबल्य राहिलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपने सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवीत काँग्रेसला आत्मचिंतनाचा धडा दिला आहे. २०१४ मध्ये मोदी लाट आणि २०१९ मध्ये पुन्हा सुप्त लाट असाच प्रत्यय निकालाने समोर आला आहे. भाजपा उमेदवार सुधाकर शृंगारे हे राजकारणात नवखे होते. 

अलिकडच्या काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात संपर्क वाढविला. त्यामुळे उमेदवारीच्या शर्यतीत शृंगारेंनी बाजी मारली आणि प्रचाराच्या प्रारंभापासून मागे वळून पाहिले नाही. निकालामध्ये अपेक्षेप्रमाणे लोहा, अहमदपूर, उदगीर या तीन विधानसभा मतदारसंघांनी भाजपाला आघाडी दिली. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निलंगा विधानसभा मतदारसंघाकडेही सर्वांचे लक्ष होते. तेथूनही ५५ हजार ९५५ इतके मताधिक्य भाजपाला मिळाले. तर काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या लातूर शहर आणि ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाने काँग्रेसला मागे टाकले. तुलनेने भाजपाचे शहर मतदारसंघातील मताधिक्य कमी आहे. तरीही  आ. अमित देशमुख यांची पकड असलेल्या शहर, ग्रामीण या दोन्ही मतदारसंघात भाजपा पुढे राहणे हा काँग्रेससाठी चिंतेचा विषय आहे. सर्वच विधानसभा मतदारसंघात वाढलेल्या मताधिक्यांमुळे भाजपामध्ये जसा उत्साह संचारेल, तशी विधानसभेच्या उमेदवारीसाठी स्पर्धाही होणार आहे. त्यामुळे उन्हाळा संपत आला असला तरी राजकीय धग येणाऱ्या काळात वाढत जाणार आहे. 

उमेदवार बदलूनही मताधिक्य कायम पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आग्रहपूर्वक शृंगारेंचे नाव पुढे आणले. उमेदवार बदलल्याने चर्चा झाली. मात्र ती चर्चा नकारात्मक वळण घेण्याआधीच पालकमंत्र्यांनी शृंगारेंची पहिली प्रचारफेरी पूर्ण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री तसेच अन्य मंत्र्यांच्या सभा घेण्यात भाजप आघाडीवर राहिली. याच्या उलटस्थिती काँग्रेसची राहिली. उमेदवार बदलूनही २ लाख ८९ हजार १११ इतके प्रचंड मताधिक्य भाजपला राहिले. २०१४ मध्ये ५८.२९ टक्के तर २०१९ मध्ये ५६.२२ टक्के असा भाजप मतांचा कौल राहिला आहे.

स्कोअर बोर्डनाव     पक्ष     मते      टक्केसुधाकर शृंगारे    भाजपा     6,61,495    56.22%मच्छिंद्र कामंत     काँग्रेस     3,72,384    31.65%राम गारकर     वंचित      1,12,255    9.54%डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी     बसपा     6,549    0.56%अरुण सोनटक्के     बरिसोपा     5,208    0.44%दत्तू करंजीकर     बमुपा     2,194    0.19%रुपेश शंके     स्वभाप     4,356    0.37%पपिता रणदिवे     अपक्ष     2,095    0.18%रमेश कांबळे     अपक्ष     2,116    0.18%मधुकर कांबळे     अपक्ष     1,326    0.11% 

टॅग्स :latur-pcलातूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल