लातूर : जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरुच असून दररोज दुचाकी चोरीच्या एक-दोन घटना घडत आहेत. घरासमोर, सार्वजनिक वाहनतळ, बसस्थानक, क्रीडा संकुल अशा ठिकाणी पार्किंग केलेल्या दुचाकीची चोरी होत आहे. सोमवारी अहमदपूर शहरातील अंबिका कॉलनी येथे घरासमोर पार्किंग केलेल्या एका कारची चोरी झाली. उदगीर येथील भोसले कॉम्प्लेक्स येथे पार्किंग केलेल्या एम.एच. १२. जीएम. ०१६४ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाली. याबाबत संजय पांडुरंग जगताप (रा. तिरुपती सोसायटी, उदगीर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उदगीर शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना मुडूळे करीत आहेत.
अहमदपूर येथील रुक्मिणीनगर येथे घरासमोर पार्किंग केलेल्या एमएच. २६ ए. झेड. ०२८७ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना मंगळवारी घडली. याबाबत धोडींबा बालाजी बोडेवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहकॉ भिसे करीत आहेत.