शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मोठी बातमी: लातूर बस अपघातप्रकरणी गुन्हा दाखल; कारणीभूत ठरलेल्या दुचाकीचालकाला उचलले

By राजकुमार जोंधळे | Updated: March 4, 2025 21:50 IST

दुचाकीस्वाराला चाकूर पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले आहे. सध्या कसून चौकशी सुरु आहे.

राजकुमार जाेंधळे, चाकूर (जि. लातूर) : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नांदगावपाटी (ता. चाकूर) येथे सोमवारी दुपारी एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात अहमदपूर आगाराची बस उलटली. या अपघातात ४१ प्रवासी जखमी झाले. त्यातील दोघांना कायमचे अपंगत्व आले आहे. दरम्यान, ज्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयात्नात हा अपघात झाला. त्या दुचाकीस्वाराला चाकूर पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले आहे. सध्या कसून चौकशी सुरू आहे.

पाेलिसांनी सांगितले की, अहमदपूर येथून लातूरकडे मार्गस्थ झालेली बस (एम.एच. २० बी.एल. १६१३) दुपारी नांदगाव पाटीनजीक आली. यावेळी एक दुचाकीस्वार रस्ता ओलांडत होता. ताे रस्ता ओलांडताना ना इंडीकेटर दाखविले, ना हात दाखिवले. त्याने अचानक आपली दुचाकी जानवळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वळविली. अचानकपणे समाेर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बसचालक नामदेव नरवटे यांचे नियंत्रण सुटले आणि बस दुभाजकावरुन चढून रस्त्यावर उलटली. बस उलटल्याचे पाहता दुचाकीस्वाराने घटनास्थळावरुन धूम ठाेकली. आष्टामाेड नजीक असलेल्या टोल नाक्यावरील सीसीटीव्हीत हा थरार कैद झाला. या प्रकरणी बसचालकाच्या तक्रारीवरुन अज्ञात दुचाकीचालकाविराेधात साेमवारी गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.

चाकूरचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोउपनि. राजाभाऊ घाडगे यांनी तपासाला गती दिली. नाक्यासह आष्टामाेड आणि इतर ठिकाणच्या सीसीटीव्हींच्या फुटेजची पाहणी केली. रेणापूर तालुक्यातील तुकाराम नागनाथ पल्ले (वय ७९) हे एका कार्यक्रमासाठी दुचाकीवरून घरणी येथे आले होते. दरम्यान, कार्यक्रम आटाेपल्यानंतर ते गावाकडे जात हाेते. नांदगावपाटी येथे आपल्यानंतर जानवळकडे दुचाकी वळविताना अचानक बससमाेर आले. याच दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात बस उलटली. या अपघात प्रकरणात तुकाराम पल्ले यास चाकूर पाेलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले असून, कसून चाैकशी सुरु आहे.

चार प्रवासी गंभीर; लातुरात उपचार सुरु 

अपघातातील जखमी ४१ पैकी २६ प्रवाशांना उपचारानंतर साेमवारी रात्री सुटी देण्यात आली. उर्वरित १५ पैकी चार प्रवासी गंभीर आहेत. यातील प्रिती कानवटे, व्यंकट भोगे यांना कायमचे अपंगत्व आले. तर अनुसया रामपटवार, इंदूबाई मडगेयांना जबर मार लागला. जखमींवर लातुरातील शासकीय सर्वाेपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. - डॉ. सचिन जाधव, लातूर

टॅग्स :laturलातूरAccidentअपघात