शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बडे दिलवाला ! मुलाच्या विवाहाबरोबर केले २२ जणांचे शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 19:28 IST

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे सरफराज मणियार यांनी आपल्या मुलाच्या विवाह सोहळ्यात इतरांनाही सहभागी करून घेता यावे, समाजातील गरजूंना मदत व्हावी, यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे नियोजन केले.

ठळक मुद्देसंसारोपयाेगी साहित्याची दिली भेट

- आशपाक पठाणलातूर : इस्लाम धर्मात निकाह (विवाह) हा अत्यंत साध्या पद्धतीने करावा, अशी शिकवण मोहम्मद पैगंबर यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या मार्गाचा अवलंब करीत, सामाजिक उत्तरदायित्व म्हणून लातूरच्या सरफराज मणियार यांनी आपल्या मुलाच्या विवाहाबरोबर समाजातील २२ जोडप्यांचा विवाह लावून दिला. त्याचबरोबर, त्यांना संसारोपयोगी साहित्य भेट देऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे सरफराज मणियार यांनी आपल्या मुलाच्या विवाह सोहळ्यात इतरांनाही सहभागी करून घेता यावे, समाजातील गरजूंना मदत व्हावी, यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे नियोजन केले. कोरोनाने अनेकांचे रोजगार गेले, हाताला काम नसल्याने काहींना मुला, मुलींच्या लग्नाची चिंता भेडसावत असताना, सरफराज मणियार यांनी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गरजू लोकांचा शोध घेतला. त्यात २२ जोडप्यांनी नोंदणी केली. कसलाही गाजावाजा न करता, अतिशय साध्या पद्धतीने रविवारी हा विवाह सोहळा संपन्न झाला. हैद्राबाद येथील धर्मगुरू मौलाना सय्यद मोहम्मद महेमुद हुसैनी कादरी यांनी नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले, तसेच इस्लामची शिकवण आणि काळाची गरज पाहता, अशा प्रकारचे विवाहसोहळे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

गरजूंना दिला मदतीचा हात...कोरोनाच्या काळात हातावरचे पोट असणारे अनेक कुटुंब संकटात सापडले. त्यांनाही मदतीचा हात दिला. कोरोना ओसरत असताना मुलाच्या विवाहाबरोबर सामुदायिक विवाह सोहळा घेण्याची संकल्पना त्यांच्या डोक्यात आली. २२ जणांची नोंदणी झाली, अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून, रविवारी सकाळी ११ वाजता लातूर शहरातील ६० फूट रोडवर असलेल्या मंगल कार्यालयात विवाह सोहळा संपन्न झाला. वऱ्हाडी मंडळींची गैरसोय होऊ नये, यासाठी शेकडो स्वयंसेवक होते. उत्कृष्ट पद्धतीचे व्हेज, नॉनव्हेजचे जेवण देण्यात आले.

इस्लामची शिकवण...गरीब असो की श्रीमंत, सर्वांनी आपल्या मुलांचा विवाह साध्या पद्धतीने करावा, जेणेकरून कुणाच्याही पालकांना विवाह ही बाब त्रासदायक वाटणार नाही, अशी इस्लामची शिकवण आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सरफराज मणियार यांनी स्वखर्चातून २२ जोडप्यांचा निकाह लावून दिला. आपल्या आनंदात इतरांना सहभागी करून घेता आले, याचा मनस्वी आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

टॅग्स :laturलातूरmarriageलग्नsocial workerसमाजसेवक