शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

Bharat Bandh : लातूर जिल्हा कडकडीत बंद; बाहुबली-कटप्पाची वेशभूषा धारण करुन केला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 14:57 IST

इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या बंदला लातूर जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 लातूर - इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या बंदला लातूर जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लातूर शहरात शाळा-महाविद्यालय वगळता व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती.

दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांनी सकाळी ९ वाजल्यापासून बंदचे आवाहन केले. बाहुबली व कटप्पाच्या वेशभुषा परिधान करुन कार्यकर्ते बंद आंदोलनात सहभागी झाले होते. लातूर शहराचे आमदार अमित देशमुख, पक्ष निरीक्षक भा. ई. नगराळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख,  माजी आमदार वैजनाथ शिंदे, अ‍ॅड. दीपक सूळ, राजकुमार जाधव, विक्रांत गोजमगुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, संजय निलेगावकर, जयचंद भिसे, अ‍ॅड. बाबासाहेब गायकवाड आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. शिवाजी चौक, नंदीस्टॉप, आदर्श कॉलनी, मित्रनगर, गांधी चौक, मिनीमार्केट येथील पेट्रोल पंपावर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर गांधी चौक, लोकमान्य टिळक चौक, शिवाजी चौक येथे आंदोलनाची सांगता करण्यात आली. औसा शहर व परिसरातही शांततेत बंद झाला. इंधन दरवाढीच्या विरोधात शहरातून सर्वपक्षीय पदाधिकाºयांनी रॅली काढून दरवाढीचा निषेध नोंदविला. चाकूर तालुक्यातील जानवळ येथेही बंदलाही उत्स्फुर्तला पाठिंबा मिळला. अहमदपूर तालुक्यातील शिरुर ताजबंद येथेही बंद पाळण्यात आला. उदगीर शहर व परिरातील शाळा-महाविद्यालय वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. शिवाजी चौकातून रॅली काढून राज्य व केंद्र सरकारचा निषेध  नोंदविण्यात आला.  चाकूर शहर बंदला प्रतिसाद मिळाला. अहमदपूर शहरात बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी तहसिलदारांना निवेदन दिले. चाकूर, अहमदपूर, औसा, निलंगा, रेणापूर, जळकोट, उदगीर, देवणी, शिरुर अनंतपाळ आणि लातूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. दुपारी ३ वाजेनंतर जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीत झाले.

एक ही भूल..कमल का फूल...पेट्रेल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरातील सर्व पेट्रोल पंपासमोर निदर्शने केली. एकही भूल.. कमल का फूल...असे फलक लावून केंद्र सरकारचा निषेध केला.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदlaturलातूरnewsबातम्या