निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही
बैठक : राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष ॲड. मोहम्मद खान पठाण
लातूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निष्ठावंत, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे. अल्पसंख्याक समाजालाही न्याय देण्याचे कार्य पक्षाकडून सुरू आहे. पक्षाची मोट बांधून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असे राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष ॲड. मोहम्मद खान पठाण येथे म्हणाले.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत सोमवारी ते बोलत होते. यावेळी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी ॲड. पठाण म्हणाले, आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. बैठकीत अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्षपदी फिरोज शेख यांची फेरनिवड करण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष वसिम बुऱ्हाण, मसूद शेख, हुजूर इनामदार, फारुख मटके, जावेद कुरेशी, मुफ्ती फैय्याज, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष विशाल विहिरे, अकबर शेख, फिरोज सय्यद, समीर शेख, मुन्ना तळेकर, जहाँगीर शेख, आदींची उपस्थिती होती.