पीक विमा योजना लागू करण्याची मागणी
लातूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पीक विमा कंपन्यांना नफा होतो, परंतु शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांसह शासनाची फसवणूक होते. त्यामुळे त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी सुनील मंदाडे यांनी शासनाला पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याची मागणी
लातूर : अनेक स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी पतपेढ्या, सहकारी बँका, कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मुदत संपलेली आहे. कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेला आहेत. निवडणूक कायद्याचा विचार करून पुढे ढकललेल्या निवडणुका तात्काळ घ्याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील मंदाडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी पतपेढ्या, सहकारी बँका व कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मुदत संपलेली आहे. कोरोनामुळे ती वाढविण्यात आली होती, असेही निवेदनात म्हटले आहे.