शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

दीपोत्सव साजरा करताना सतर्कता बाळगावी; महावितरणचे आवाहन

By आशपाक पठाण | Updated: November 7, 2023 19:02 IST

आगीच्या दुर्घटना होणार नाहीत यासाठी घ्यावी काळजी

लातूर : दिवाळी म्हणजे आनंदाचा व रोषणाईचा सण. या दीपोत्सवात घरांवर, व्यावसायिक प्रतिष्ठानांवर आकर्षक रोषणाई केली जाते. फटाके फोडले जातात. मात्र, या आनंद उत्सवात निष्काळजीपणामुळे आग लागण्याच्या घटना घडतात व परिणामी आनंदावर विरजण पडते. त्यामुळे दिवाळी साजरी करताना सावधगिरी बाळगूनच उत्सव साजरा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

गत सप्ताहात गंजगोलाई परिसरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याच्या तीन ते चार घटना घडल्या. यामध्ये मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर खाद्यसाठा साठवला असल्यामुळे उंदरांचा प्रादुर्भाव झाल्याने वायरिंग कट होऊन शॉर्ट सर्किट झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. त्याचबरोबर दिवाळीतील दिव्यांमुळे वीज वितरण व्यवस्थेवर भार पडतो, अशा स्थितीत विजेचा वापर आवश्यक तेवढाच झाला पाहिजे. दिवाळीला छोटीशी चूकही अपघाताला कारणीभूत ठरू शकते, अशा परिस्थितीत दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. दिवे लहान मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दूर ठेवा.

विद्युत उपकरणे दर्जेदार हवीत...घर, उद्योग, कार्यालये, शेती आदी ठिकाणी वीज वापरताना प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. वीज पुरवठा घेताना किंवा वेळोवेळी विद्युत केबलस्वीचेस अथवा इतर उपकरणे ही आयएसआय प्रमाणित असल्याचे व योग्य क्षमतेचे असल्याची खात्री करावी. विद्युत सर्किटवर क्षमतेपेक्षा जास्त भार टाकू नये. प्रमाणित ठेकेदारांकडूनच विद्युतीकरणाची कामे करून घ्यावीत. वायरिंगसाठी योग्य क्षमतेचे एमसीबी (मिनिएचर सर्किट ब्रेकर) वापरावे जेणेकरून अतिभार किंवा शॉर्टसर्किटमुळे धोका निर्माण होणार नाही. गुणवत्ता नियंत्रण मंडळाने प्रमाणित केलेली विद्युत उपकरणे वापरावीत.

...हे लक्षात असू द्या:• रोषणाईसाठी कमी वॅटच्या एलईडी दिव्यांचा वापर करा.• विद्युत सॉकेट्सवर अधिक भार टाकू नये.• रोषणाईसाठी वापरण्यात येणारे विद्युत दिवे, त्यांच्या तारा व सॉकेट्स तपासून घ्यावे.• वीज तारांजवळ फटाके उडवू नयेत.• विजेच्या उपकरणांजवळ फटाके ठेवू नयेत.• फटाके मोकळ्या जागेतच उडवावेत.• फटाक्यांची आतषबाजी करताना आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात.• फटाक्यांचा कचरा वीज यंत्रणेजवळ फेकू नका.

टॅग्स :laturलातूरDiwaliदिवाळी 2023