शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

लातूर जिल्ह्यातील प्रकल्पांत जेमतेम जलसाठा; फक्त २८ टक्केच उपयुक्त पाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 16:03 IST

दोन मध्यम प्रकल्प जोत्याखाली, पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे

लातूर : यंदाच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाला नाही. त्यामुळे यंदा लवकरच टंचाईचे ढग येण्याची भीती आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आठपैकी सहा मध्यम प्रकल्पांत केवळ २८.३७ टक्के जलसाठा आहे. परिणामी, पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे ठरत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात विलंबाने पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खरिपाच्या पेरण्याही उशिरा झाल्या. साधारणत: जूनअखेरीसपासून पेरणीस सुरुवात झाली. तद्नंतर रिमझिम पाऊस झाल्याने पिकांची चांगली उगवण झाली. मात्र, जलसाठ्यात कुठलीही वाढ झाली नाही. ऑगस्टमध्ये पावसाने ताण दिल्याने खरिपातील सोयाबीनच्या उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात घट झाली. दरम्यान, दरवर्षी परतीचा अधिक पाऊस होतो, असा गेल्या तीन-चार वर्षांपासूनच अनुभव आहे. त्यामुळे परतीचा पाऊस येईल, अशी आशा होती. मात्र, ऑक्टोबरमधील दोन आठवडे उलटत आले तरी पाऊस नाही. त्यामुळे आता पावसाची आशा धूसर झाली आहे.

३४ दलघमी उपयुक्त पाणीसाठाजिल्ह्यात एकूण ८ मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी रेणापूर तालुक्यातील व्हटी व उदगीर तालुक्यांतील तिरू मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत. त्यामुळे तिथे उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के आहे. त्याचबरोबर उर्वरित सहा मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ३४.६५० दलघमी पाणीसाठा आहे. त्यात सर्वाधिक पाणीसाठा घरणी प्रकल्पात असून, तो ८.४६७ दलघमी आहे. सर्वात कमी उपयुक्त जलसाठा तावरजा मध्यम प्रकल्पात असून, तो १.०९९ दलघमी आहे.

१५ दिवसांपूर्वीच्या पावसाने पाणीसाठायंदाच्या पावसाळ्यात सातत्याने जेमतेम पाऊस झाला आहे. त्यामुळे जलसाठ्यात पुरेशी वाढ झाली नाही. त्यामुळे तीन आठवड्यांपूर्वी तीन मध्यम प्रकल्प जोत्याखाली होते. दरम्यान, १५ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे एका मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात चांगली वाढ झाली. त्यामुळे उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

प्रशासनाकडून वारंवार सूचनायंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने प्रकल्पातील अवैध पाणी उपसा रोखण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. सध्या १३४ लघु प्रकल्पांमध्ये ८६.८०९ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून, त्याची २७.६२ अशी टक्केवारी आहे. दरम्यान, यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

व्हटी, तिरुमध्ये उपयुक्त पाणी शून्य टक्केमध्यम प्रकल्प - उपयुक्त साठा दलघमीमध्ये - टक्केवारीतावरजा - १.०९९ - ५.४०व्हटी - जोत्या - ००रेणापूर - ५.०३१ - ३४.४८तिरू - जोत्या - ००देवर्जन - ४.६२९ - ४३.३४साकोळ - ७.१८० - ६५.५८घरणी - ८.४६७ - ३७.८९मसलगा - ८.२४५ - ६०.६३एकूण - ३४.६५० - २८.३७

सरासरी ५४० मिमी पाऊस...तालुका - सरासरी पाऊसलातूर - ५३९.४औसा - ४६४.९अहमदपूर - ५२२.६निलंगा - ५२७.८उदगीर - ६८९.२चाकूर - ४८०.६रेणापूर - ४६६.१देवणी - ६९९.४शिरुर अनं. - ५२४.४जळकोट - ५२६.९एकूण - ५४०.०० 

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणlaturलातूरWaterपाणी