शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षाच, पेरणीसाठी बळीराजाचे नभाकडे डोळे!

By हरी मोकाशे | Updated: June 29, 2023 18:10 IST

बहुतांश भागात अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, पेरणीस प्रारंभ झाला नाही.

लातूर : आर्द्रा नक्षत्रात कधी रिमझिम तर कधी मध्यम पाऊस होत असल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश भागात अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागून आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ६०.३ मिमी पाऊस झाला आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र उन्हाचे चटके बसले. त्यामुळे सर्वांचे पावसाळ्याकडे लक्ष लागून होते. दरम्यान, शेतकऱ्यांनी खरीप हंगामपूर्व शेती मशागतीची कामे आटोपून बी- बियाणे, खताची जुळवाजुळव सुरु केली होती. मृग निघाल्यानंतर पाऊस होईल आणि उष्णतेपासून बचाव होण्याबरोबरच वेळेवर पेरणी होईल, अशी आशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होती. परंतु, मृग कोरडा गेला. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.

गत आठवड्यात आर्द्रा नक्षत्रास सुरुवात झाली आणि वातावरणातही बदल झाला. ढगाळ वातावरण निर्माण होऊन कधी रिमझिम तर कधी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे बळीराजास दिलासा मिळाला. लवकरच मोठा पाऊस होईल आणि चाढ्यावर मुठ धरता येईल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली. मात्र, बहुतांश भागात अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, पेरणीस प्रारंभ झाला नाही.

देवणीतील तिन्ही मंडळात दमदार...देवणी तालुक्यात आतापर्यंत सरासरी ९२.९ मिमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील देवणी मंडळात ९०.३, बोरोळमध्ये १००.६, वलांडीत ८७.६ मिमी पाऊस झाला आहे. तांदुळजा मंडळात ७६.८, लामजना- ७५.२, अहमदपूर- ७४.९, किनगाव- ८०.४, शिरुर ताजबंद- ९८.४, कासार बालकुंदा- ७७.७, कासारशिरसी- ८३.८, हलगरा- ७७.३, उदगीर- १०१.६, नागलगाव- ११२.५, मोघा- १६४.५, हेर- ७९.७, तोंडार- ९६.७, चाकूर- ९३.२, झरी- ८६.३, पानगाव- ८४.६, पळशी- १०१.४, साकोळ- ७७, हिसामाबाद मंडळात ८२.४ मिमी पाऊस झाला आहे.

पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरणी करु नये...जिल्ह्यातील अनेक भागात अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. सलग दोन - तीन दिवस दमदार पाऊस होऊन शेतात ५ ते ६ इंच ओल झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी करावी. अन्यथा उगवण होण्यावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई करु नये.- रक्षा शिंदे, प्रभारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

बियाणे, खतांची खरेदी करा...पेरणीसाठी पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरणी करु नये. तसेच पाऊस झाल्यानंतर शेतकरी बी- बियाणे, खते खरेदीसाठी बाजारात येतात. त्यामुळे बाजारपेठेत एकच गर्दी होते. शेतकऱ्यांनी आताच बियाणे, खतांची खरेदी करावी. त्यामुळे ऐनवेळी धावपळ होणार नाही.- सुभाष चोले, कृषी विकास अधिकारी.

देवणी तालुक्यात सरासरी ९२ मिमी पाऊस...लातूर             ४७.७औसा             ३१.४अहमदपूर             ६९.३निलंगा             ५६.८उदगीर             ८७.४चाकूर             ६२.६रेणापूर             ६६.४देवणी             ९२.९शिरुर अनं.             ७१.९जळकोट             ३६.७

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसlaturलातूर