शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ औराद कडकडीत बंद; कर्नाटक, तेलंगणात जाणारी बससेवा बंद

By संदीप शिंदे | Updated: September 4, 2023 16:07 IST

महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या तिन्ही राज्यात औराद शहाजानी येथून जाणाऱ्या बसेसच्या १२२ फेऱ्या बंद

औराद शहाजानी : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील घटनेच्या निषेधार्थ सोमवारी औराद शहाजानी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यात शहरातील विविध २२ व्यापारी संघटना ,आडत बाजार यांच्यासह सर्व शैक्षणिक संस्थांनी सहभाग नोंदविला.

दरम्यान महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या तिन्ही राज्यात औराद शहाजानी येथून जाणाऱ्या बसेसच्या १२२ फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या होत्या.जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये मराठा समाजाच्या आंदाेलकावर करण्यात आलेल्या लाठीचार्जचा निषेध म्हणून साेमवारी औराद शहाजानीत बंद पुकारण्यात आला. यात शहरातील आडत बाजार, सराफ बाजारपेठ, जनरल स्टोअर्स, कपडा, किराणा आदी २२ व्यापारी संघटनांसह शैक्षणिक संस्थांनी बंदला पाठिंबा दिला.

सोमवारी सकाळी शहरातून सकल मराठा समाजाच्या वतीने माेटार सायकल रॅली काढण्यात आली. मुख्य रस्ता, बसस्थानक, बालाजी मंदिर, भवानी मंदिर, गांधी चाैक, विवेकानंद चाैक, आडत मार्केटमार्गे लातूर-जहिराबाद महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅली पोहोचली. यानंतर सर्व आंदाेलकांनी एकत्र येत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत लाठीहल्ल्याचा निषेध नोंदविला. यावेळी पद्मसिंह पाटील, छावाचे भगवान माकणे, कन्हैया पाटील, लखन बाेडंगे, शिवाजी शेटकार, दिंगबर अंतरेड्डी, अर्जुन मेहकरे, माधव गाडे, अंकुश भंडारे, विलास कांबळे, कृष्णा गाडे, राहुल पाटील, शाम पाटील, अभिषेक बिरादार, मनाेज भंडारे, भरत दापके, अमाेल पाटील, रविंद्र भंडारे, राेहीत शिंदे, सुरज भंडारे, आदेश भंडारे, प्रदीप उगिले, संभाजी गाडे, वैभव बेलुरे, संताेष बाेडंगे, सिध्दु शिवणे, आशिष थेटे, आदित्य पवार, ज्ञानेश्वर बोंडगे आदींसह नागरिकांची उपस्थिती होती. तिन्ही राज्यात ये-जा करणारी बससेवा औराद शहाजानी बंदच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आल्याचे निलंगा आगार प्रमुख गणेश बिडवे यांनी सांगितले. तसेच बंदच्या पार्श्वभुमीवर औराद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

चाकूर, अहमदपूर, नळेगाव, हाळी येथे कडकडीत बंद...जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ अहमदपूर, चाकूर, नळेगाव, हाळी हंडरगुळी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच जळकाेट येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

टॅग्स :laturलातूरMaratha Reservationमराठा आरक्षण