शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

विरोधात प्रचाराला आलेले अटलबिहारी वाजपेयी म्हणाले, 'चाकूरकर अच्छे आदमी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 18:57 IST

दीर्घकाळ सत्तास्थानी असताना शिवराज पाटील चाकूरकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार असो की, विरोधी पक्ष यांच्या धोरणांवर भाष्य केले. व्यक्तिगत टीका केली नाही.

लातूर : सातवेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांनी सहा दशकांच्या राजकीय कारकिर्दीत विराेधकांनाही जिंकले. काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढताना त्यावेळचे भाजपाचे उमेदवार डॉ. गोपाळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आलेले भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. परंतु, काँग्रेसचे उमेदवार शिवराज पाटील चाकूरकर यांचा त्यांनी अच्छे आदमी असा उल्लेख केला. दुसऱ्या दिवशी माध्यमांमधून त्याचीच बातमी झाली. स्वत: चाकूरकर यांनीही कोणत्याही निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारावर व्यक्तिगत टीका केली नाही.

विरोधकांचा आदरपूर्वक उल्लेख...दीर्घकाळ सत्तास्थानी असताना शिवराज पाटील चाकूरकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार असो की, विरोधी पक्ष यांच्या धोरणांवर भाष्य केले. व्यक्तिगत टीका केली नाही किंबहुना अनेक भाषणांमध्ये समोरच्या उमेदवारांचे नाव आदरपूर्वक ते घ्यायचे.

इस बेटी ने मुझे हराया...सलग सात वेळा लोकसभेवर निवडून गेलेले चाकूरकर २००४च्या निवडणुकीत पराभूत झाले. भाजपाकडून उभ्या असलेल्या रुपाताई पाटील निलंगेकर निवडून आल्या होत्या. मात्र, त्यावेळी डॉ. मनमोहनसिंग सरकार सत्तेत आले आणि पराभूत झाल्यानंतरही चाकूरकर यांनी केंद्रात गृहमंत्रिपदाची शपथ घेतली. ते राज्यसभेवर निवडले गेले. दरम्यान, संसदेत लातूरचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रुपाताई पाटील निलंगेकर जेव्हा समोर आल्या तेव्हा त्यांनी स्वत:हून अभिनंदन केले. इतकेच नव्हे तर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची ओळख करून दिली. लातूर से मुझे इस बेटी ने हराया, असे स्मित हास्य करत ते म्हणाले. राजकारणातील पद, प्रतिष्ठा, सत्ता यापलिकडे विचार आणि धोरण असे राजकारण करणारे नेतृत्व शुक्रवारी काळाच्या पडद्याआड गेले.

English
हिंदी सारांश
Web Title : Vajpayee, campaigning against, called Chakurkar 'a good man'.

Web Summary : Despite political differences, Atal Bihari Vajpayee praised Congress leader Shivraj Patil Chakurkar. Chakurkar, a seven-time MP, respected opponents, avoiding personal attacks. Even after losing to Rupa Patil Nilangekar, Chakurkar maintained grace, highlighting his statesmanship and dignified political approach.
टॅग्स :Shivraj Patil Chakurkarशिवराज पाटील चाकूरकरlaturलातूर