शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हं वाढले, पशुधनाची घ्या काळजी; अन्यथा दूध, रोगप्रतिकारशक्ती होईल कमी!

By हरी मोकाशे | Updated: March 16, 2024 16:06 IST

दावणीला जनावरे दाटीवाटीने बांधू नका

लातूर : मार्चमध्येच उन्हाची तीव्रता वाढली असून पारा ३९ अं. से. वर पोहोचला आहे. उष्ण हवामानामुळे पशुधनाचे दूध उत्पादन घटण्याबरोबरच रोगप्रतिकारशक्तीही कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे पशुपालकांनी अधिक काळजी घ्यावी. कडक उन्हात जनावरांना चरण्यासाठी सोडू नये, उष्णतेमुळे गरम झालेले पाणी पाजणे टाळावे, असा सल्ला जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दिला आहे.

काही दिवसांपासून उष्णता वाढली आहे. दुपारच्यावेळी अबालवृध्द घामाघूम होत आहेत. मनुष्याप्रमाणे पशुधनाच्या आरोग्यावरही उष्ण हवामानाचा परिणाम होतो. त्यामुळे पशुपालकांनाही आपल्या पशुधनाच्या संरक्षणासाठी दक्षता घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय पशूधन ५ लाख १४ हजार ६४५ आहे तर शेळ्यांची संख्या १ लाख ४५ आणि ३५ हजार मेंढ्या आहेत. पशुपालकांनी पशुधनास कडक उन्हात चारण्यासाठी सोडू नये. लोखंडी हौदामध्ये गरम झालेले पाणी पाजणे टाळावे. दावणीस जनावरे दाटीवाटीने बांधू नये. मृत जनावरांची विल्हेवाट चराऊ कुरणाच्या ठिकाणी करु नये, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

कमाल अन् किमान तापमानात वाढ...तारीख - कमाल - किमान तापमान८ मार्च - ३८ - १८९ मार्च - ३७ - २०.५१० मार्च - ३६ - २१.५११ मार्च - ३९ - २२.५१२ मार्च - ३९ - २३.५१३ मार्च - ३९.५ - २४.५१४ मार्च - ३८.५ - २३१५ मार्च - ३९ - २३.५

उन्हामुळे अशी घ्या काळजी...जनावरांना शक्यतो सकाळी अन् सायंकाळी चरण्यासाठी सोडावे. हवामानपूरक सुधारित गोठे बांधावेत, जेणेकरुन गोठ्यात हवा खेळती राहील. छपराला शक्यतो पांढरा चुना अथवा रंग लावावा. तसेच त्यावर पालापाचोळा टाळावा. त्यामुळे सूर्याची किरणे परावर्तीत होण्यास मदत होईल. गोठ्याच्या सभाेवताली झाडे असावी. दुपारी गोठ्याभोवती बारदाणा, शेडनेट लावावे. जनावरांना मुबलक प्रमाणात थंडी पाणी उपलब्ध करुन द्यावे. शेती मशागतीची कामे सकाळी व सायंकाळी करावीत. पाण्यात आवश्यकतेनुसार मिठाचा वापर करावा. थंड वातावरणात चारा टाकावा. वेळोवेळी लसीकरण करुन घ्यावे. म्हशीच्या कातडीचा काळा रंग व घामग्रंथीच्या कमी संख्येमुळे गाईपेक्षा त्यांना उष्णेतेचा अधिक त्रास होतो. त्यामुळे अधिक काळजी घ्यावी.

उन्हामुळे भूक मंदावते...उन्हामुळे जनावरांची भूक मंदावते. कोरडा चारा खात नाहीत. हलचाल मंदावते. शरीराचे तापमान वाढल्याने जाेरजोरात श्वास घेते. भरपूर घाम येतो. दूध उत्पादन कमी होण्याबराेबर प्रजनन क्षमता आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे उन्हाळ्यात पशुधनाची अधिक काळजी घ्यावी.- डॉ. श्रीधर शिंदे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र