साेशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह पाेस्ट व्हायरल केल्याची घटना एक वर्षापूर्वी घडली हाेती. याबाबत चाकूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, याप्रकरणी चाकूर येथील पाेलिसांनी एकाला अटक केली आहे.
पाेलिसांनी सांगितले, समाजात तेढ निर्माण करणारा आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याची घटना एक वर्षापूर्वी चाकूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीत घडली हाेती. याबाबत बिलाल पठाण याने सदर मजकूर हा आपले साेशल मीडियाच्या अकाऊंट हॅक करुन टाकल्याची तक्रार दिली हाेती. दरम्यान, पाेलीस निरीक्षक साेपान सिरसाट, पाेहकाॅ. हनुमंत आरदवाड यांनी याप्रकरणी तपास करत अखेर छडा लावला. लातूर येथील सायबर सेलच्या मदतीने महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. या प्रकरणात अधिक सखाेल चाैकशी केली असता, सदरील आक्षेपार्ह पाेस्ट बिलाल पठाण याच्या माेबाईलवरुनच व्हायरल केले नसल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाले. दरम्यान, अहमदूपर येथील एका सायबर कॅफे सेंटरमधून सदरची पाेस्ट व्हायरल केल्याचे उघड झाले. याप्रकरणी अखेर एक वर्षभरानंतर हकानी शेख याला चाकूर पाेलिसांनी अटक केली. त्याच न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे. त्याने याबाबतची कबुली दिली आहे. असेही पाेलीस निरीक्षक साेपान सिरसाट म्हणाले.