यावेळी राज्यमंत्री बनसोडे यांनी योजनेसाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश संबंधित विभागास दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले तसेच या शिष्टमंडळाने माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आ. संभाजी पाटील-निलंगेकर यांनाही निवेदन दिले. शिष्टमंडळात माजी सरपंच राम भंडारे, रफी सय्यद, माजी सरपंच प्रा. महेमूद सौदागर, संदीप जगताप, नागेश बदनाळे, धनराज बिरादार आदी उपस्थित होते.
...
अतनूर येथे ३ हजार १११ बालकांना डोस
अतनूर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३१४७ पैकी ३१११ बालकांना पल्स पोलिओची लस देण्यात आली.
यावेळी शिवाजी परगे, डॉ. संजय पवार, डॉ. हरेश्वर सुळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी माजी सरपंच दत्ता घोणसीकर, आरोग्य सहाय्यक उत्तम चव्हाण, एस. व्ही. कलवले, दत्ता चामले, राजेंद्र पाटील, सुळकेकर, मांगीलवार आदी उपस्थित होते.
...