शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मुरूड-लातूर रस्त्यावर पुन्हा अपघात; ट्रॅव्हल्स पुलावरून कोसळली, १९ प्रवासी जखमी 

By संदीप शिंदे | Updated: December 7, 2023 17:20 IST

अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र १९ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत

बोरगाव काळे ( लातूर ) : उदगीर येथून पुणेकडे ४२ प्रवाशांना घेऊन जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स एमएच २४ एयु ७०७० बुधवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास मुरुड-लातूर रस्त्यावरील पुलावरून कोसळली. यात जीवितहानी झाली नसून, १९ पेक्षा अधिक प्रवाशांना किरकोळ मार लागल्याने त्यांना उपचारासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बुधवारी रात्री उदगीर येथील ४२ प्रवासी घेऊन पुण्याकडे निघालेली ट्रॅव्हल्स साखरापाटी नजीक आली असताना पुलाच्या जवळ असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर गेल्याने थेट पुलावरून खाली उलटली. त्यात १९ पेक्षा अधिक प्रवाशी किरकोळ जखमी झाले. घटनास्थळी रुग्णवाहिकेद्वारे जखमी प्रवाशांना लातूरच्या रुग्णालयात पाठविण्यात आले. रात्रीच्या वेळी अंधार असल्याने जखमींना बाहेर काढण्यासाठी अडथळा येत होता. यावेळी घटनास्थळी गातेगाव पोलीस हजर झाल्याने सर्व जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. ज्या प्रवाशांना खरचटले सुद्धा नाही अशा प्रवाशांना दुसऱ्या ट्रॅव्हल्सने पुण्याकडे सुखरूप पाठविण्यात आले.

मुरूड -लातूर रस्त्यावर कायम अपघात...मुरूड लातूर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याने या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. बारा नंबर पाटी ते मुरूड अकोला रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. मात्र पुलाचे काम करण्यात आले नाही. रस्ता रुंदीकरण झाले तरी या मार्गावरील पूल अरुंद आहेत. त्यामुळे पुढे पूल असल्याचे वाहनधारकांच्या लक्षात येत नसल्याने पुलाजवळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

पुलाजवळ गतिरोधक तरीही अपघात...बारा नंबर ते मुरूड अकोला दरम्यान चौपदरीकरण करण्यात आले आहे. तर पुलाचे काम रखडलेलेच आहे. त्यामुळे रस्त्यावरील पुलावर अनेक अपघात झाले आहेत. पुढे पूल असल्याचे वाहधारकांच्या लक्षात येत नसल्याने थेट वाहने पुलावरून खाली कोसळत आहे. त्यामुळे मागील महिन्यात पुलाजवळ गतिरोधक बसविण्यात आले आहेत. तर पुलावर अपघात होऊन अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.

टॅग्स :laturलातूरAccidentअपघात