शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमध्ये दारु दुकानांविरोधात संतप्त महिलांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 19:38 IST

दारु दुकान बंद करावे, या प्रमुख मागणीसाठी महिलांसह नागरिकांनी रस्त्यावरच आज ठिय्या आंदोलन केले.

लातूर : शहरातील प्रभाग क्र. १२ मधील जुनी रेल्वे लाईन परिसरात असलेले दारु दुकान बंद करावे, या प्रमुख मागणीसाठी महिलांसह नागरिकांनी रस्त्यावरच आज ठिय्या आंदोलन केले. शिवाय, एमआयडीसी पोलीस ठाण्यातही आक्रमक महिलांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी देत ठिय्या मांडला. या परिसरातील नागरिकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले.

शहरातील प्रभाग क्र. १२ जुने रेल्वेलाईन रस्ता, पंचवटीनगर परिसारात देशी दारुची किरकोळ विक्रीचे दुकाने स्थलांतरीत झाले असून, या दोन्ही दारु दुकानांमुळे प्रकाशनगर, गिरवलकर नगर, वाल्मिकीनगर, सोनानगर, आम्लेश्वर नगर, विकास नगर, सय्यदनगर, कुलस्वामिनी नगर आदीं परिसरातील महिला, नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. परिणामी, मद्यपींचा येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले होते. प्रशासनाकडून या निवेदनाची कुठलीही दखल घेण्यात आली नाही. परिणामी, नगरसेविका दीपाताई गिते, अ‍ॅड. गणेश गोमसाळे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिला, नागरिकांनी दुकानात घुसून दारुंच्या बाटल्या रस्त्यावर आणून फोडत प्रशासनाचा निषेध नोंदविला. या दारुदुकानाविरोधात महिलांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले.  

शिवाय, जिल्हा प्रशासनाच्या प्रतिकात्मक पुतळ््याचे दहन करुन बांगड्याचे आहेर दिले. आंदालनानंतर महिला, नागरिकांचा मोर्चा हालगी वाजवित एमआयडीसी पोलीस ठाण्यावर धडकला. पोलीस ठाण्याच्या परिसरात महिलांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलीस प्रशासनाकडून आंदोलनक महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र, प्रशासनाकडून आपल्या मागण्यांची जाणिवपूर्वक दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला. याला पोलीस प्रशासनाचेही पाठबळ मिळत आहे. या भागात अवैध व्यवसायाकडे एमआयडीसी पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे, नागरिकांनी सांगतिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयावरही धडकला मोर्चा...शहरातील प्रभाग क्र. १२ मध्ये असलेले दारु दुकान बंद करावे, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात राहणाऱ्या महिला, नागरिकांनी प्रशासनाकडे पाठपुरावा, निवेदने दिली आहेत. मात्र, प्रशासनाकडून आपल्या मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. याविरोधात संतप्त महिलांनी चक्क दारु दुकानांवर चाल करुन, दुकानातील दारुंचे बॉक्स रस्त्यावर आणून फोडले. यावेळी एमआयडीसी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलनक महिलांचे समाधान झाले नाही. एमआयडीसी पोलीस ठाण्यापासून हा मोर्चा हालगीच्य निनादात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक शशिकला गोमचाळे, दीपाताई गिते, देवाभाऊ साळुंके, अ‍ॅड़ गणेश गोमचाळे, अ‍ॅड़ अन्सार शेख, सुशील जळकोटे आदींची उपस्थिती होती़

टॅग्स :laturलातूरagitationआंदोलनalcohol prohibition actदारुबंदी कायदा