हाळी गावात सात अंगणवाड्याची संख्या आहे. त्यापैकी चार अंगणवाड्याना मालकीच्या खोलीत आहेत. एक अंगणवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेतील खोलीत भरविली जाते. तर अंगणवाडी क्रमांक ६ मागील दहा वर्षांपासून व अंगणवाडी क्रमांक ४ दोन वर्षांपासून अजूनही किरायाच्या खोलीतच आहेत. सदरच्या खोल्या छोट्या असल्याने शैक्षणिक साहित्यानेच भरल्या आहेत. त्यामुळे बालकांना बसण्यासाठी जागाच शिल्लक राहत नसल्याचे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवले. सध्या कोरोनामुळे अंगणवाड्यात बालकांची उपस्थिती नसली तरी अंगणवाडी ताईंना दररोज उपस्थित राहून दैनंदिन काम पूर्ण करावे लागते. एकात्मिक बालविकास विभागाकडून अंगणवाडी सेविकांमार्फत बालकांना दर महिन्याला पूरक आहार दिला जातो. सहा महिन्याला बालकांची आरोग्य तपासणी केली जाते. दर महिन्याला लसीकरण केले जाते. या दोन अंगणवाड्यांना मालकीची जागा व बांधकाम करून देण्याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायतीला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कळवूनही दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
अंगणवाड्यांना हक्काची जागा मिळेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:14 IST