शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

जैन मंदिरात प्राचीन कोरीव मूर्ती, दुर्मीळ शिल्पकलेचा ठेवा दुर्लक्षित, औशामधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 4:22 AM

भूकंपानंतर पुनवर्सन झालेल्या औसा तालुक्यातील कार्ला गावात प्राचीन जैन मंदिर असून, या मंदिरात साधारणत: पाच फूट उंचीच्या तीन कोरीव मूर्ती आहेत़ मधली मूर्ती सप्तफणा पार्श्वनाथांची आहे़

लातूर  - भूकंपानंतर पुनवर्सन झालेल्या औसा तालुक्यातील कार्ला गावात प्राचीन जैन मंदिर असून, या मंदिरात साधारणत: पाच फूट उंचीच्या तीन कोरीव मूर्ती आहेत़ मधली मूर्ती सप्तफणा पार्श्वनाथांची आहे़ ती आकर्षक असून, बाजूच्या दोन मूर्ती थोड्या खंडित झालेल्या आहेत़ अत्यंत बारीक कलाकुसर व यक्ष-यक्षिणीच्या सुबक आकर्षक मूर्ती सुव्यवस्थित असल्या तरी देखभालीचा अभावामुळे ही ऐतिहासिक दुर्मीळ शिल्पकला दुर्लक्षीत आहे़या शिल्पकलेची पाहणी नांदेडच्या जैन इतिहास संशोधिका डॉ़ अरुणा काला यांनी करून या ऐतिहासिक शिल्पकलेचा ठेवा जपण्याचे आवाहन केले़कार्ला येथील जैन मंदिर प्राचीन असून, १९९३ ला झालेल्या भूकंपामुळे या गावाचे पुनर्वसन झाले आहे़ भूकंपात गाव उजाड झाले असले, तरी मंदिर सुरक्षित आहे़आठ बाय आठच्या दगडी शिळेवर नक्षीकाम केलेले हे मंदिर असून, मंदिराच्या एका बाजूला दगडी शिळेनेच बांधलेले घर आहे़मंदिराच्या चारही बाजूला खांब असून, या खांबांवरही नक्षीकामआहे़ मंदिराला दार नाही़दगडी शिळेचे अरुंद प्रवेशद्वारआहे़ प्रवेशद्वारावरही मूर्ती कोरलेल्या आहेत़मंदिरात विशेष आणि दुर्मिळ आदिनाथ भगवंतांचे यक्ष गोमुख प्रतीक चिन्ह आहे़ गोल दगडावर ते कोरलेले असून, हे मंदिर दगडी शिळेवर कोरलेले आहे़ छतावरही मोठमोठ्या शिळा ठेवलेल्या आहेत़या मंदिराची देखभाल झाल्यावर गावाला वैभव प्राप्त होईल़ मंदिर प्राचीन असून, एक ऐतिहासिक जैन दस्तऐवज आहे, असेही डॉ़ अरुणा काला यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले़ 

टॅग्स :laturलातूर