शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

नऊ फूट लांब, १५० किलो वजनाची मगर थेट शेतात घुसल्याने ग्रामस्थ भयभीत

By संदीप शिंदे | Updated: August 2, 2024 18:06 IST

नदी, नाल्यास पाणी आल्याने मगरीचा वावर वाढल्याने ब्रह्मवाडीत भीतीचे वातावरण

अहमदपूर : तालुक्यातील ब्रह्मवाडी येथील शेतकरी शिवदास घुगे यांच्या शेतात नऊ फूट लांबीची मगर आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तासाभराच्या प्रयत्नानंतर मगरीस पकडण्यास यश आले आहे. दरम्यान, पावसामुळे नदी, नाल्यास पाणी आल्याने मगर पाण्याबाहेर आल्याचा अंदाज आहे.

ब्रह्मवाडी येथील शेतकरी शिवदास घुगे यांनी शेतात मगर दिसताच भ्रमणध्वनीवरून वनपरिक्षेत्र कार्यालयास माहिती दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र कार्यालय अहमदपूर येथील कर्मचाऱ्यांनी तत्काळ ब्रह्मवाडी येथे जाऊन शेतकरी घुगे यांच्या शेतात मगर असल्याची खात्री केली. वरिष्ठ अधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी आश्विनी आपेट यांच्या मार्गदर्शानाखाली पथक तयार करण्यात आले. वनपरिमंडळ अधिकारी गोंविदराव माळी, राम केसाळे, जी.बी. काळे, वनरक्षक भीमराव गडकर, विश्वनाथ होनराव, राठोड, भाऊसाहेब अंबुलगेकर, मीरा बोंबले, सर्पमित्र सिद्धार्थ काळे, आशिष कलुरे, उद्धव देगलूरे, योगेश तेलंगे, कान्हा पांचाळ या कर्मचाऱ्यांनी मगर रेस्क्यू केली. पशुधन विकास अधिकारी डॉ. सुयोग येरोळे यांनी मगरीची वैद्यकीय तपासणी केली.

मगरीला पुणे येथे पाठविण्यात येणार...सदरील मगर ही नर जातीची असून, सध्या पाऊस सुरु असल्याने नदी, नाले वाहत आहेत. त्यातूनच आली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मगरीचे वय अंदाजे १० ते ११ वर्षे आहे. वजन १५० किलो व मगर नऊ फूट लांबीची आहे. मगरीला पुणे येथील रेस्क्यू सेंटर येथे पाठविण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी