येथील तहसील कार्यालय, नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनास देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या शहरात अतिक्रमण हटावच्या नावावर बसस्थानकाच्या पूर्व दिशेला असलेल्या छोट्या व्यावसायिकांना उठविण्याची प्रक्रिया केली जात आहे. मात्र बसस्थानकाच्या पश्चिमेकडे प्रस्थापित बडे व्यावसायिक आपल्या दुकानासमोर अनधिकृतपणे साहित्य ठेवून तसेच भाडेकरू, पोटभाडेकरू ठेवून अतिक्रमण केले आहेत. मात्र, त्यांच्यावर कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मागणीचे निवेदन श्रमिक हक्क अभियानचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले आहे. निवेदनावर पांडुरंग कदम, दशरथ कांबळे, राजकुमार गायकवाड, गोपाळ निरोडे, बालाजी निरोडे, नरसिंग लातुरे, शेख आलिम, अखिल मलेवाले, अलीम मलेवाले, दत्ता तपसाळे, अजित डोणगावे, शिवाजी तपासे, दिनकर गिरबोने, सय्यद जब्बार, इस्माईल जानापुरे, इब्राहिम बागवान, प्रकाश सूर्यवंशी, नाथराम जाट, प्रभाकर वाघमारे, शेख फिरोज, ईश्वर पाटील, रुक्मिणबाई थोरे, युनूस मनियार, वहीद काजी, शेख अकबर, प्रथमेश म्हेत्रे आदींच्या सह्या आहेत.