शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कोरडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 12:32 IST

लघु प्रकल्पांत केवळ ६़९५२ द.ल.घ.मी. साठा

ठळक मुद्देमांजरा पट्ट्यात भीषण पाणीटंचाई

लातूर : लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ४६२ मि.मी. पाऊस झाला असला तरी पाणीसाठ्यात मात्र वाढ नाही़ त्यामुळे शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे़ ३२५ गावांना ४८५ अधिग्रहणाद्वारे तर ४६ गावांना ५३ टँकरद्वारे पाणीपुरवठा आहे़ पावसाळा संपत आला तरी मध्यम प्रकल्पांसह लघु प्रकल्पांत ६़९५२ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे़

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात केवळ ४़५० द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे़ आॅक्टोबर अखेरपर्यंत पुरेल एवढेच पाणी या प्रकल्पात आहे़ जिल्ह्यातील रेणापूर - ०़००, तीरू  -१़९८, देवर्जन - १़७३, व्हटी - ०़२२०, साकोळ -१़६५७, तावरजा-०़००, घरणी - १़३५४, मसलगा प्रकल्पात ०़०० एवढा पाणीसाठा आहे़ मध्यम ८ आणि लघू १३२ प्रकल्पात मिळून ६़९५२ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे़ निलंगा शहरासह औसा तालुक्यातील काही गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या निम्न तेरणा प्रकल्पात बऱ्यापैकी म्हणजे १३़३३२ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे़ पावसाची वार्षिक सरासरी ८०२ आहे़ सरासरीच्या ५८ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली असली तरी प्रकल्प मात्र कोरडेच आहेत़ त्यामुळे जिल्ह्यात भीषण टंचाईचे संकट आहे़ 

मांजरा पट्ट्यात भीषण पाणीटंचाईमांजरा पट्ट्यातील गाधवड, तांदुळजा, सारसा, वांजरखेडा, कानडी बोरगाव, टाकळगाव, जोडजवळा, जेवळी आदी गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे़ जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, अहमदपूर, जळकोट, उदगीर, शिरूर अनंतपाळ, चाकूर, देवणी, औसा या तालुक्यामध्ये पाणीटंचाई आहे़, तर निलंगा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी प्रकल्पामध्ये पाणीसाठा असल्यामुळे या तालुक्याला तूर्त दिलासा आहे़.

टॅग्स :Rainपाऊसlaturलातूर